नळदुर्गमध्ये ५५ वर्षीय व्यक्तीचा खून 

 
crime

नळदुर्ग : इंदिरानगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील संजय हनुमंत कोळी, वय 55 वर्षे यांचा दि. 24- 25.02.2022 रोजी दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी काहीतरी अवजड वस्तू डोक्यात मारुन खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संजय कोळी यांचा मृतदेह नळदुर्ग ग्रामस्थ- सुधीर पाटील यांच्या शेतातील कॅनलमधील पाण्यात टाकला. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- लक्ष्मण हनुमंत कोळी यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीच्या तीन घटना 

लोहारा  : बेलवाडी, ता. लोहारा येथील अनिल तुकाराम शिंदे, वय 32 वर्षे यांनी प्लास्टीकचे टोपले न विचारता नेल्याचा जाब भाऊबंद- ग्यानराज सोपान शिंदे यांना दि. 24.02.2022 रोजी 18.00 वा. सु. बेलवाडी शिवारातील शेतात विचारला. यावर ग्यानराज शिंदे व त्यांचा मुलगा- रामकिसन यांसह सिध्दु वामन शिंदे अशा तीघांनी अनिल शिंदे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिल शिंदे यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : ताकविकी, ता. उस्मानाबाद येथील अख्तर अहमदखाँ पठाण हे दि. 27.02.2022 रोजी 18.30 वा. सु. गावातील रस्त्याने मिनी ट्रक क्र. एम.एच. 25 यू 1388 हा चालवत जात होते. यावेळी गावकरी- सुवर्णसिंग अशोकसिंग ठाकुर हे त्यांच्या मोटारसायकलसह रस्त्यावर उभे असल्याने अख्तर पठाण यांनी त्यांना मो.सा. रस्त्याबाजूस घेण्यास सांगीतल्याने सुवर्णसिंग व अख्तर यांच्या वाद झाला. यानंतर सुवर्णसिंग यांसह गावकरी- बालाजी ठाकुर, अंकुश राजपुत, सुधीर ठाकुर, सुरज ठाकुर, प्रदीप बिटलकर, विनोद आरणकर, जयदीप बिटलकर, किरोरसिंग आरणकर या सर्वांनी 19.00 वा. सु. गावात अख्तर पठाण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. यावेळी अख्तर यांच्या बचावास आलेल्या सलमान पठाण यांसही नमूद लोकांनी मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अख्तर पठाण यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : जवळका, ता. वाशी येथील आबासाहेब पाटील व त्यांचा मुलगा- आशीष हे दोघे दि. 24.02.2022 रोजी 15.00 वा. सु. पारगाव येथील रस्त्याने कार क्र. एम.एच. 12 केवाय 3741 ने प्रवास करत होते. यावेळी दहीफळ ग्रामस्थ- पद्मानंद अंगद भोरे यांनी मोटारसायकलने पाठीमागून येउन दड मारुन पाटील यांच्या कारची पाठीमागील काच फोडली. तसेच आशीष यांना गाडीतून खाली ओढून लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजाने मारहान केल्याने त्यांच्या खांद्याचे हाड मोडले. तसेच आशीष यांच्या गळ्यातील सुवर्ण साखळी काढून घेतली. यावेळी आशीष यांच्या वडीलांनी त्यांच्या बचावाचा प्रयत्न केला असता त्यांनाही भोरे यांनी शिवीगाळ करुन मारहान केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आशीष पाटील यांनी दि. 27.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 325, 327, 504, 506, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web