उस्मानाबादेत ३५ लाखाची फसवणूक 

 
crime

उस्मानाबाद  : उषा क्लिनिंग सोल्युशन्स कंपनीचे उषा गुप्ता, अंकुश गुप्ता उर्फ रिया, मितेश कुमार, रश्मी देव, सर्व रा. उत्तर प्रदेश यांसह बिएन मार्केटाईल प्रा. लि. कंपनीचे व्ही.एस. पत्ताबीरामन, मनिषा एम., गोपाल, सर्व रा. चेन्नई या सार्वांनी संगणमताने ओमसिध्द इन्पेक्स फर्म, उस्मानाबाद या कंपनीस चांगल्या प्रतिचा माल पुरवण्याचा करार केला. त्या बदल्यात ओमसिध्द इन्पेक्स फर्मकडुन 35,49,000 ₹ रक्कम देण्यास भागपाडून दि. 03.10.2022 ते 07.11.2022 रोजी दरम्यान ठरल्या प्रमाणे त्यांना चांगल्या प्रतिच्या मालाचा पुरवठा न करता ओमसिध्द इन्पेक्स फर्मची फसवणूक केली. अशा मजकुराच्या ओमसिध्द इन्पेक्स फर्मचे जयदिप गोवर्धन काळे यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 120 (अ), 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्गमध्ये चोरीच्या दोन घटना 
 

नळदुर्ग  : बाभळगाव, ता. तुळजापूर येथील- तुळसाबाई अप्पाराव बनसोडे, वय 30 वर्षे या त्यांच्या पतीसोबत दि. 16.11.2022 रोजी 13.30 ते 13.45 वा. दरम्यान गोलाई चौक, नळदुर्ग येथील रस्त्याने मोटारसायकलने प्रवास करत होत्या. दरम्यान एका मोटारसायकलवर आलेल्या नळदुर्ग येथील- अफसर रुकमौद्दीन शेख यांसह तीन अनोळखी पुरुषांनी बनसोडे यांच्या मो.सा. ला आडवी लाउन तुळसाबाई यांसह त्यांच्या पतीस काठी, लोखंडी गजाने मारहान करुन तुळसाबाई यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण गंठण जबरदस्तीने हिसकावून पसार झाले. अशा मजकुराच्या तुळसाबाई बनसोडे यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  : अणदुर शिवारातील रिलायन्स जिवो मनोरा (टॉवर) क्र.- टी.आय.जी.आर. 9080 च्या ओडीसीतुन अंदाजे 60,000 ₹ किंमतीच्या कॉस्लाईट कंपनीच्या 100 एएच क्षमतेच्या 2 बॅटऱ्या दि. 03.11.2022 रोजी 18.30 ते 19.15 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या पर्यवेक्षक- आणासाहेब जगन्नाथ कोळेकर यांनी दि. 16.11.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web