उस्मानाबादेत २५ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

 
crime

उस्मानाबाद : एका 25 वर्षीय तरुणीवर (नाव- गाव गोपनीय) गावातीलच एका तरुणाने मागील दोन महिन्यांपासून गाव शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी वेळोवेळी लैंगीक अत्याचार केले. तसेच तीला बोलावल्यावर ती न आल्यास तीच्या नातेवाईकात तीची बदनामी करण्याची धमकी त्या तरुणाने दिली. अशा मजकुराच्या पिडीत तरुणीने दि. 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबाद   : आष्टी, जि. बीड येथील प्रवीण सुर्यभान गायकवाड, प्रमोद सुर्यभान गायकवाड, संजय तारु, आप्पा महादेव करडिले, मुकेश रमेश निकाळजे या सर्वांनी सन 05.01.2017 ते 29.04.2022 दरम्यानच्या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या उस्मानाबाद शाखेत श्रीहरी शंकर चव्हाण, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यांसह त्यांच्या मित्रांना बनावट दस्तऐवजाच्या सहायाने नोकरीचे खोटे आश्वासन दिले. तसेच त्यांच्याकडून एकुण 2,40,000 ₹ रक्कम घेउन त्यांची आर्थिक फसवणूक केली. अशा मजकुराच्या श्रीहरी चव्हाण यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे दिलेल्या प्रथम खबरेवरुन न्यायालयाच्या आदेशान्वये काल दि. 01 मे रोजी भा.दं.सं. कलम- 420, 467, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळीत हाणामारी 

बेंबळी  : बेंबळी, ता. उस्मानाबाद येथील सुरज माने, अमित गायकवाड, प्रशांत माने, अभिजीत गायकवाड, विश्वप्रताप माने या सर्वांनी मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन दि. 30.04.2022 रोजी 20.30 वा. सु. बेंबळी येथे गावकारी- रोहित दिलीप विधाते यांसह त्यांचा मामे भाऊ- ऋषीकेश होळकर यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रोहित विधाते यांनी दि. 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.                                                                                   

                                                            

 

 

 

From around the web