वाशीत  तिर्रट जुगार खेळणाऱ्या २४ लोकांना अटक 

लाखो रुपयाचा ऐवज जप्त 
 
s

 वाशी -  शहरातील पारा चौक येथे तिर्रट  नावाचा जुगार खेळणाऱ्या २४ लोकांना पोलिसांनी अटक केली असून, रोख रक्कम 99,010 ₹ तसेच 12 मोटर सायकली, २३ मोबाइल,पत्याचे 255 बॉक्स जप्त केले आहेत. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव  जिल्हा हद्दीत अवैद्य धंदयाची माहिती काढून कारवाई करणे कामी दि.09.07.2023 रोजी 16.00 वा. सु. मा. एम. रमेश सहा. पोलीस अधीक्षक उप विभाग कळंब यांना पो स्टे वाशी हद्दीत पारा चौक येथे आले असता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जुने बसस्थानकाचे  बाजूला तिर्रट नावाचा जुगार चालु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने उप विभागीय पोलीस अधिकारी  कार्यालय कळंब येथील अधिकारी व अमंलदार याचे सह 16.30 वा. छापा मारला तेथे 24 लोक गोलकार बसुन तिर्रट  नावाचा जुगार खेळत असतांना मिळून आल्याने त्यांचेकडे एकुण  रोख रक्कम 99,010 ₹ तसेच 12 मोटर सायकलीज्याची अंदाजे एकुण किंमत 5,65,000 व एकुण 23 मोबाईल फोन  एकुण 2,09000 रु तसेच एकुण पत्याचे 255 बॉक्स किंमत अंदाजे 1,98,000 रुपये  अशी एकुण किंमत 10,71,910 रुपयाचा मुद्देमाल व रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन यातील आरोपी विरुध्द कलम 4,5 म.जु.का. प्रमाणे पोलीस ठाणे वाशी  येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

sd

सदरची कामगिरीपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पांलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या आदेशाने मा. एम. रमेश सहा. पोलीस अधीक्षक उप विभाग कळंब, यांचे मार्गदशर्नाखाली  पो स्टे कळंब व उपविभागीय पोलीस अधिकारी कळळंब येथील पोउपनि पुजरवाड, पोलीस अमंलदार748/ फतेपुरे,976/ तारळकर, पोलीस नाईक 1065/ सय्यद, 481/ जाधव, पोलीस ठाणे कळंब,पोलीस नाईक शेख, पोलीस अमंलदार भांगे, पठाण,  खांडेकर,गरड, राउत, चव्हाण, पोलीस हावलदार चाफेकर पोलीस ठाणे वाशी येथील सहा.पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस हावलदार लोंढे, पोलीस नाईक लाटे, यादव, सय्यद, सुरवसे, पोलीस अमंलदार भैरट वारे, घुले यांचे पथकाने केली. 

From around the web