उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 23 छापे

 
crime

उस्मानाबाद - . पोलीस अधीक्षकअतुल कुलकर्णी व  अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन काल गुरुवार दि. 15.12.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 23 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,120 लि. अंबवलेला द्रव पदार्थ हा नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट नष्ट करण्यात आला तर सुमारे 728 लि. गावठी दारु, सुमारे 180 लि. शिंदी हे अंमली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 241 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 2,99,906 ₹ आहे. यावरुन 24 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 23 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात डिग्गी, ता. उमरगा येथील- संजय पवार व खलील जमादार हे दोघे 12.50 वा. सु. संजय पवार यांच्या डिग्गी येथील शेताजवळ 10 लोखंडी- प्लास्टीक पिंपांत   गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 2,520 लि. द्रव पदार्थ, 10 कि.ग्रॅ. वजनाच्या 180 गुळाच्या ढेपी व 90 लि. गावठी दारु असा माल बाळगलेले, तर माडज येथील- काशीनाथ सुगावे हे 19.30 वा. सु. गावातील आपल्या हॉटेलबाजूस 18 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

2) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात वाशी पो.ठा. हद्दीत गोजवाडा, ता. वाशी येथील- मनिषा शिंदे या 13.30 वा. सु. आपल्या घरासमोर देशी- विदेशी दारुच्या 116 सिलबंद बाटल्या बाळगलेल्या आढळल्या. तर भुम पो.ठा. हद्दीत पारधी पिढी, भुम येथील- ताराबाई काळे या 17.00 वा. सु. पिढीवरील आपल्या घरासमोर 220 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. तसेच तुळजापूर पो.ठा. हद्दीत जवाहर चौक, तुळजापूर येथील- भारतसिंग राजपूत हे 20.30 वा. सु. नवीन बस स्थानकाजवळील शेडसमोर 180 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.

3) तुळजापूर पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे टाकले. यात हंगरगा फाटा येथील- परमेश्वर गायकवाड हे 18.20 वा. सु. हंगरगा फाटा येथे 30 लि. गावठी दारु बाळगलेले, तर तुळजापूर येथील- रामा क्षिरसागर हे 18.50 वा. सु. तुळजापूर येथील मार्केट परिसरात देशी- विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर कुंभारी, ता. तुळजापूर येथील- शशिकांत तांबे हे 19.00 वा. सु. कुंभारी ते कोरेवाडी रस्त्यालगतच्या रानवारा ढाब्यावर देशी दारुच्या 22 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर अपसिंगा येथील- कर्ण डोलारे हे 19.30 वा. सु गावातील आपल्या घरासमोर 20 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

4) मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात मुरुम येथील- सिध्देश्वर तांबोरे हे 10.30 वा. सु. गावातील मारुती मंदीराजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले, तर आलुर येथील- छगण लोहार हे 19.00 वा. सु. गावातील अचलेर रस्त्याकडेला देशी दारुच्या 6 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

5) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात जेवळी येथील- दाउद पठाण हे 13.10 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर देशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर उदतपूर, ता. लोहारा येथील- बिभीषन दलाल हे 19.00 वा. सु. गावातील आपल्या हॉटेलसमोर देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

6) ढोकी पो.ठा. च्या पथकाने कोंड गावात 2 छापे टाकले. यात कोंड ग्रामस्थ- नवनाथ भोसले हे 19.45 वा. सु. नितळी रस्त्यालगत 65 लि. गावठी दारु बाळगलेले, तर श्रावण जाधव हे 20.30 वा. सु. गावातील बाजार तलावजवळील शेडसमोर 70 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

7) भुम पो.ठा. च्या पथकाने पारधीपिढी, भुम येथे 2 छापे टाकले. यात पारधिपीडी येथील- मंगलबाई काळे या 14.20 वा. सु. पिढीवरील आपल्या घरासमोर 180 लि. गावठी दारु बाळगलेल्या, तर आरसोली, ता. भुम येथील- आप्पा काळे हे 17.30 वा. सु. पारधीपिढी परिसरात 15 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

8) बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात समुद्रवाणी येथील- प्रभु राठोड हे 18.20 वा. सु. उस्मानाबाद ते औसा रस्त्यालगतच्या एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या बाळगलेले, तर रुईभर येथील- प्रविण शेरखाने हे 18.50 वा. सु. गावातील चिकन दुकानाजवळ देशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

9) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने केशेगाव गावात छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- मुबीन फकिर हे 20.00 वा. सु. गावातील बस स्थानकाजवळ देशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

10) अंबी पो.ठा. च्या पथकाने डोंजा शिवारात छापा टाकला. यावेळी करमाळा, जि. सोलापूर येथील- सोमनाथ काळे हे 14.50 वा. सु. डोंजा ते बंगाळवाडी रस्त्यावर 10 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.

11) शिराढोन पो.ठा. च्या पथकाने लोहटा गावात छापा टाकला. यावेळी करंजकल्ला ग्रामस्थ- अमरसिंह पवार हे 15.30 वा. सु. लोहटा येथील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या बाळगलेले असताना आढळले.

12) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने वाघोली, ता. कळंब येथे छापा टाकला. यावेळी ग्रामस्थ- कलावती पवार या 20.30 वा. सु. गावातील आपल्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 600 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असताना आढळल्या.


जुगार विरोधी कारवाई

भुम  : अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान भूम पो.ठा. च्या पथकाने दोन दि. 15.12.2022 रोजी दोन ठिकाणी छापे टाकले. यात कसबा (भूम) येथील- अजित मोरे हे 17.40 वा. सु. गावातील बस स्थानक परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 730 ₹ रोख रक्कम बाळगलेले, तर वालवड येथील- नवनाथ पाटोळे हे 18.00 वा. सु. गावातील आठवडीबाजार परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,110 ₹ रक्कम बाळगलेले असताना आढळले.

मुरुम  : भुसणी, ता. उमरगा येथील- धनराज जमादार हे दि. 14.12.2022 रोजी 21.00 वा. सु. भुसणी येथील बस स्थानकाजवळील शेडसमोर मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 3,870 ₹ रोख रक्कम बाळगलेले असताना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहे.

From around the web