बेंबळी ग्रामपंचायतमध्ये २३ लाखाचा अपहार 

सरपंच आणि ग्रामसेवकावर गुन्हा दाखल 
 
crime

बेंबळी : बेंबळी, ता. उस्मानाबाद येथील-सरपंच- सौ. वंदना नवनाथ कांबळे, तर मेडसिंगा, ता. उस्मानाबाद येथील- ग्रामसेवक- अंगद विलासराव आगळे  या दोघांनी संगणमताने  दि. 10.04.2021 ते आज पावेतो  ग्रामपंचायत बेंबळी यांना पंधराव्या वित्त आयोगात प्राप्त झालेल्या निधीचा एकुण केलेल्या कामाच्या मुल्यांकनापेक्षा व विविध साहीत्य खरेदीच्या संखेपेक्षा जास्तीची किंमत दाखवून एकुण 23,06,528₹ ची शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची आर्थिक फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या बच्चेसाहेब हणमंतराव देशमुख विस्तार अधिकारी पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी दि. 17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 406, 409, ,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 मारहाण

बेंबळी  : नितळी, ता. उस्मानाबाद येथील- प्रतिक रामकृष्ण क्षिरसागर, प्रतिक काकडे, अनिकेत लोंढे, महाविर क्षिरसागर, वैभव क्षिरसागर या सर्वांनी दि.15.06.2023 रोजी 16.00 वा.सु. नितळी शिवार गावकरी- ओमकार राजेंद्र महानुभव यांना आकाश यांनी  शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या ओमकार महानुभव यांनी दि. 17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 504, 143, 147, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web