उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 22 छापे
उस्मानाबाद - पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन काल शुक्रवार दि. 29.07.2022 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 22 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा 1,000 लि. द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर 271 लि. गावठी दारु, 65 लि. शिंदी हा अंमली द्रव व देशी- विदेशी दारुच्या 181 बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रीत किंमत 97,420 ₹ आहे. यावरुन 22 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 22 गुन्हे खालीलप्रमाणे दाखल करण्यात आले आहेत.
1) कळंब पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात गायरान पारधी पिढी, ईटकुर येथील सविता संजय काळे ह्या आपल्या घरासमोर तर पारधी पिढी, मोहा येथील सोजरबाई बालाजी काळे ह्या आपल्या घराबाजूस गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला द्रव पदार्थ अनुक्रमे 350 लि. व 200 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असताना आढळल्या.
2) भुम पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात पारधी पिढी, भुम येथील मनिषा तानाजी काळे ह्या पिढीवर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रणाचा आंबवलेला अंदाजे 450 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या तर वाकवड ग्रामस्थ- रेश्मा राजेंद्र शिंदे ह्या आपल्या घरासमोर 9 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
3) ढोकी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात राजेशनगर पारधी पिढी, ढोकी येथील तोळाबाई बाबासाहेब चव्हाण ह्या ढोकीतील लातुर रस्त्याकडेला 65 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर पळसप येथील बानुबी सिकंदर शेख ह्या गावातील रस्त्यालगत 40 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
4) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने सांगवी (काटी) येथे दोन छापे टाकले असता ग्रामस्थ- सुरेखा दिलीप सुरते व माधुरी जगदिश शिंदे या दोघी आपापल्या घरासमोर अनुक्रमे 17 लि. व 19 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
5) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात सारोळा (बु.) येथील साखरबाई राजेंद्र पवार ह्या गावातील औसा रस्त्यालगत 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर अंबेजवळगा येथील नागेश दस्तया गुत्तेदार हे गावातील आपल्या पत्रा शेडसमोर 20 लि. शिंदी हा अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.
6) मुरुम पो.ठा. च्या पथकाने तिन ठिकाणी छापे टाकले असता यात कंटेकुर ग्रामस्थ- पांडुरंग दयानंद घोटाळे हे गावातील रस्त्याकडेला 25 लि. गावठी दारु बाळगलेले, दाळींब ग्रामस्थ- अंबाजी गंगाराम सातपुते हे गावात 25 लि. गावठी दारु बाळगलेले तर सुपतगाव ग्रामस्थ- विश्वनाथ मारुती सगट हे गावात 26 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
7) अंबी पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात शेळगाव ग्रामस्थ- अनिल भगवान कंगले हे गावातील एका हॉटेलजवळ 35 बाटल्या देशी दारु बाळगलेले तर डोंजा ग्रामस्थ- खाजादिन महेबुब पठाण हे गावातील गुदामाजवळ 20 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
8) लोहारा पो.ठा. च्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकले असता यात तावशीगड ग्रामस्थ- बाबु महादु मिटकरी हे गावातील म. बस्वेश्वर चौकातील एका शेडजवळ 20 बाटल देशी दारु बाळगलेले तर होळी तांडा येथील संजय त्र्यंबक चव्हाण हे तांड्यावरील एका किराणा दुकानाजवळ 19 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
9) नळुदर्ग पो.ठा. च्या पथकास इटकळ ग्रामस्थ- राजेंद्र जगन्नाथ तेलंग हे गावातील एका बियर शॉपिजवळ 45 लि. शिंदी हा अंमली द्रव बाळगलेले असताना आढळले.
10) परंडा पो.ठा. च्या पथकास वाकडी ग्रामस्थ- बापुराव गोविंद वळेकर हे गावातील ग्रामपंचायकतजवळील पत्रा शेडबाजूस 27 बाटल्या देशी दारु बाळगलेले असताना आढळले.
11) येरमाळा पो.ठा. च्या पथकास पेंढरी गल्ली, येरमाळा येथील आक्काबाई दिगंबर काळे ह्या आपल्या घरासमोर 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या असताना आढळल्या.
12) उमरगा पो.ठा. च्या पथकास धाकटीवाडी ग्रामस्थ- तानाजी गोविंद ढोणे हे गावातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत 12 लि. गावठी दारु बाळगलेले असताना आढळले.
13) शिराढोण पो.ठा. च्या पथकास खडकी, ता. कळंब येथील अंगद अरुण पारेकर हे करंजकल्लातील रस्त्याने मोटारसायवरुन विदेशी दारुच्या 60 बाटल्या अवैध रित्या वाहून नेत असताना आढळले. यावरुन पोलीसांनी विदेशी दारुसह मो.सा. जप्त केली आहे.