भूम तालुक्यात 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार 

 
Osmanabad police

भुम -  भुम तालुक्यातील एका 13 वर्षीय मुलीस (नाव- गाव गोपनीय) लग्नाच्या उद्देशाने तीच्याच नात्यातील एका तरुणाने आपली आई,  मामा, मामी व मामेभाऊ यांच्या सहकार्याने आपल्या राहत्या घरी दि. 22 सप्टेंबर ते 04 ऑक्टोबर या काळात नेउन ठेवले. दरम्यानच्या काळात त्या तरुणाने त्या अल्पवयीन मुलीसोबत अनेकदा लैंगीक संबंध ठेवले. यावरुन संबंधीत मुलीच्या आईने दिलेल्या प्रथम खबेरवरुन भा.दं.सं. कलम- 376 व पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मारहाणीच्या दोन घटना 

ढोकी : कोळेकरवाडी येथील प्रभावती कोळेकर व त्यांचया सुनेस दि. 04 ऑक्टोबर रोजी राहत्या घरासमोर गावकरी एडके कुटूंबातील- भाऊसाहेब, विष्णु, आकाश, अतुल, छोटु, सौरभ, वैभव, सुधाकर, गोजर, महानंदा यांसह कोळेकर कुटूंबातील- महादेव, तुकाराम, अरुण, तारामती अशा 14 व्यक्तींनी जुन्या भांडणाच्या वादातून शिवीगाळ करुन लाकडी फळीने मारहान करुन जखमी केले. तसेच नमूद लोकांनी प्रभावती यांच्या घरासमोरील त्यांची मोटारसायकल पेटवून दिली. अशा मजकुराच्या प्रभावती यांनी दि. 05 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 143, 147, 148, 149, 504, 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
बेंबळी : घरासमोरील कठड्यावर असलेला पत्रा काढण्याच्या वादातून रुईभर येथील रुबाबी पठाण यांसह त्यांचे पती- गफुर, मुलगे- बाबा, अल्लानुर यांस ग्रामस्थ लोमटे कुटूंबातील- किसन, निर्मला, आकाश, सुनिल यांनी काठीने मारहान करुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या रुबाबी पठाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web