उस्मानाबादेत अपघातग्रस्त वाहनात १३० किलो गांजा सापडला , दोघांना अटक 

 
crime

उस्मानाबाद  - शिंगोली विश्राम गृहासमोरील मेघदूत हॉटेलजवळ भरधाव वेगाने जाणारी कार ट्रॅक्टर-दुहेरी ट्रेलरला धडकली, या अपघातग्रस्त कारमध्ये  १३० किलो  गांजा सापडला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 


जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद स्थानिक.गुन्हे.शाखेचे पथक अवैध कारवायांवर आळा घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावर दि. 15-16.02.2023 दरम्यानच्या रात्री गस्त घालत होते. गस्ती दरम्यान आज दि.16.02.2023 रोजी पहाटे 04.30 च्या सुमारास एका विना नोंदणी क्रमांकाच्या, काळ्या रंगाच्या टाटा पंच कारचा त्यांनी संशयावरुन पाठलाग सुरु केला असता ती कार पोलीसांना टाळून अतीवेगात बीडच्या दिशेने जाउ लागली.  

शिंगोली विश्राम गृहासमोरील राष्ट्रीय महामार्गावर कार चालकाच्या चुकीने ती कार अनियंत्रीत होउन एमएच 25 एएस 8367 या ट्रॅक्टर-दुहेरी ट्रेलरला धडकली. या अपघात स्थळी स्था.गु.शा. सह आनंदनगर पोलीसांच्या सपोनि-गोरक्ष खरड यांच्या पथकाने भेट दिली होती. यावेळी त्याकारच्या डिकीमध्ये व मागील आसनावर  ठेवलेल्या 65 पुड्यांतुन 130.5 कि.ग्रॅ. वजनाच्या गांजा या अंमली वनस्पतीची अवैध वाहतुक कार चालक दिनेश भवरलाल जाट, वय 21 वर्षे व त्याचा सहकारी शाहरुख जाकीर पठाण, दोघे रा. राजस्थान राज्य हे आंध्रप्रदेशातुन राजस्थानकडे करत असल्याचे आढळले.

यावर पोलीसांनी नमुद गांजासह कार, 2 स्मार्टफोन जप्त करुन दोन्ही आरोपींना अटक केली असुन पोउपनि-चंद्रशेखर पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठा.त एन डी पी एस कायदा कलम 8, 20 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शाचे पोनि-जाधव, आनंदनगर पो ठा.पोनि पारेकर, सपोनि- पवार, खरड पोउपनि- संदिप ओव्हळ तसेच आनंदनगर पो.ठा. व स्थागुशा पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

From around the web