परंडा : ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

दुसऱ्या घटनेत १७ वर्षीय मुलीचा विनयभंग 
 
Osmanabad police

परंडा  : एक 11 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 30 सप्टेंबर रोजी गावातील किराणा दुकानात जात होती. यावेळी गावातील एका तरुणाने तीला ओढून रस्त्याबाजूच्या शेतात नेउन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. हा प्रकार त्या मुलीने घरी जाउन आपल्या कुटूंबीयांना सांगीतला.  यावरून तीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तर दुसऱ्या घटनेत अनुसुचित जातीच्या एका 17 वर्षीय मुलीचा (नाव- गाव गोपनीय) घरमालक तरुण गेली सहा महिने पाठलाग करत असे. त्या तरुणाने तीला दि. 29 सप्टेंबर रोजी आपल्या घरी बोलावून तीचा विनयभंग केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीच्या आईने दि. 30 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 354, 506 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


गुरुवारी (दि.३०) टाकळी येथील ११ वर्षीय मुलगी गुरुवारी दुपारी ३.३० ते ४ दरम्यान दळण आणण्यासाठी पिठाच्या गिरणीत जात असताना प्रकाश बारसकर याने मुलीवर शेतात नेवून अत्याचार केला. कोणास सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीस परंडा उप-जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले अाहे. पीडित मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात प्रकाश बारसकर याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत (पाेस्को) गुन्हा दाखल करण्यात आला. 

तसेच परंडा शहरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून वेळोवेळी लैंगिक छळ केला. याप्रकरणी एकाविरुद्ध परंडा पोलिस ठाण्यात पोस्को, ॲट्रासीटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. शहरातील सचिन हाके याने त्याच्या घरात भाड्याने राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस वारंवार घरात बोलावून फेब्रुवारी ते २९ सप्टंेबर या कालावधीत लैंगिक छळ केला. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून सचिन हाके याच्याविरुद्ध परंडा पोलिसात अॅट्रॉसिटी, पोस्को, विनयभंग आदी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश करीत आहेत.

 वडार  संघटनेकडून निषेध 

परंडा तालुक्यातील टाकळी येथील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा वडार  संघटनेच्या वतीने निषेध करत खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीस कडक शिक्षेची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांमार्फत करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अविनाश ईटकर, उपाध्यक्ष सुनिल पवार, तालूका अध्यक्ष भास्कर ईटकर, राम ईटकर,ब्रम्हदेव मांजरे, परमेश्वर पवार, शामराव पवार, अमर भोसले, चंदू पवार, अविनाथ भोसले, शंकर पवार, अनिल पवार, नवनाथ पवार, बिभीषण पवार, दिलीप पवार, भीमा जाधव आदींची स्वाक्षरी आहे.

From around the web