धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या चार घटना
भूम : आरोपी नामे-1)निवृत्ती वसंत जागदंड, 2) वासुदेव उर्फ वसंत जोगदंड, )बहीण आशाबाई गौतम मुकटे,4) गौतम मुकटे सर्व रा.जांब ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी दि.27.08.2023 रोजी 19.30 वा. सु. जांब, ता. भुम येथे फिर्यादी नामे- हनुमंत वासुदेव जोगदंड, वय 39 वर्षे रा. जांब, ता. भुम जि. उस्मानाबाद यांना शेतीच्या वादाचे कारणावरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने, काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नीस वदोन मुलीस लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.तसेच जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी हनुमंत जोगदंड यांनी दि.29.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा : आरोपी नामे- 1) विनोद पांडुरंग शिंदे, 2) प्रमोद पांडुरंग शिंदे, रा. लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि.29.08.2023 रोजी 08.00 वा. सु. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी लोणी येथील चहाचे हॉटेल समोर फिर्यादी नामे- सुखदेव विश्वनाथ टोंम्पे, वय 45 वर्षे, रा. लोणी, ता. परंडा जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपी क्र 1 यांचे उपसरपंच पदावरुन अपात्र झाल्यामुळे त्याचा राग मनात धरुन व उपसरपंच पद तुझ्यामुळेच गेले आहे असे म्हणून नमुद आरोपीतांनी सुखदेव टोंम्पे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी सुखदेव टोंम्पे यांनी दि.30.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे- 1) दुशात दिलीप बनसोडे, 2) आतीश दिलीप बनसोडे, 3)यश गौतम बनसोडे 4)लिीप बापू बनसोडे, सर्व रा. बौध्द नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 25.08.2023 रोजी 18.30 वा. सु. बौध्दनगर उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- गौतम धोंडीराम कांबळे, वय 43 वर्षे, रा. बौध्दनगर उस्मानाबाद यांना पाणीपुरीचा गाडा आल्यावर पाणीपुरी घेण्यासाठी थांबविले व माझी पाणीपुरी घ्यायची झाल्यानंतर तुझ्याकडे येईल असे म्हणाल्याचे राग मनात धरुन नमूद आरोपीतांनी फिर्यादी गौतम कांबळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यंनी, दगडाने व कोयत्याचे मुठीने मनगटावर मरुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी गौतम कांबळे यांनी दि.30.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे- 1) प्रदिप मगर, 2) राजेंद्र मगर, 3)साहिल मगर 4)नवनाथ मगर,5) सुरज मगर, 6) अविनाश मगर, 7) रोहित मगर, 8) नागेश मगर, 9) धिरज मगर, 10) प्रशांत मगर,11) आण्णा मगर,12) हनुमंत मगर, 13) छबुबाई मगर, 14) मनिषा मगर आनोळखी 30 ते 40 महिलाव पुरुष सर्व रा. खानापूर ता. जि. उस्मानाबाद यांनी दि. 18.08.2023 रोजी 21.30 वा. सु. खानापूर येथे फिर्यादी नामे- बालाजी त्रिंबक नवले, वय 39 वर्षे, रा. खानापूर ता. जि. उस्मानाबाद यांचे घरात घुसून त्यांना घरापासून मारुती मंदीर पर्यंत नमुद आरोपीतांनी ओढत आणून तु आमच्या जातीच्या ग्रा.पं. सदस्या मनिषा प्रदिप मगर यांच्या घराच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रारी अर्ज का दिला असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यंनी,चपलाने मारहाण केले. तुला आमचा इंगा दाखवतो व तुझा काटा काढतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी बालाजी नवले यांनी दि.30.08.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 452, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.