उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी 

 
crime

शिराढोण : मंगरुळ, ता. कळंब येथील- महेश भागवतराव धस यांच्या शेतातील सालगड्याने दि. 18.08.2022 रोजी 22.00 ते दि. 19.08.2022 रोजी 06.00 वा. दरम्यान धस यांच्या शेतातील शेडमधील 20 पोती सोयाबीन, 2 पोती ज्वारी व व्हिडीओकॉन कंपनीचा टीव्ही असा एकुण 60,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या महेश धस यांनी दि. 07.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : जाकेपिंपरी, ता. परंडा येथील- सागर गुरुदास लांडगे यांच्या मालकीचा सातफनी लोखंडी मोगडा दि. 01- 0609.2022 रोजी दरम्यानच्या रात्री गावातील तुळजाभवानी दुध संकलन केंद्रासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सागर लांडगे यांनी दि. 07.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तावरजखेडा तांडा, ता. उस्मानाबाद येथील- संतराम बालाजी चव्हाण यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची टीव्हीएस रायडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 5137 ही दि. 06- 07.09.2022 रोजी दरम्यानच्या रात्री चव्हाण यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संतराम चव्हाण यांनी दि. 07.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : होलदुर, ता. आळंद, जि. गुलबर्गा येथील- दिगंबर नागण्णा गंगणे यांची अंदाजे 30,000 ₹ किंमतीची होंडा कंपनीची मोटारसायकल क्र. के.ए. 32 ईके 9196 ही दि. 31.08.2022 रोजी 23.00 वा. सु. उमरगा येथील साई हॉस्पीटल समोरील वाहन तळातून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिगंबर गंगणे यांनी दि. 07.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोराखळीत हाणामारी 

 येरमाळा : चोराळखी, ता. कळंब येथील- वैभव व सुशील महादेव खंडागळे या दोघा भावांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 06.09.2022 रोजी 21.00 ते 22.00 वा. सु. चोराखळी येथील एका बंद किराणा दुकानासमोर ग्रामस्थ- सिमा मच्छिंद्र शिंदे व ज्ञानेश्वर भानुदास जगताप यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीसारख्या हत्याराने, काठीने मारहान करुन त्या दोघांना जखमी केले. यावेळी महादेव भगवान खंडागळे यांनी या मारहाणीस प्रोत्साहन दिले. अशा मजकुराच्या सिमा शिंदे यांनी दि. 07.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 114, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web