कोरोनामुळे चीनमध्ये घटस्फोटाच्या घटनांत वाढ...
Mar 18, 2020, 20:33 IST
सध्याच्या घडीला संपूर्ण जगासाठी कोरोना ही सर्वात मोठी समस्या कायम आहे. आता कोरोनासुद्धा विवाहित जोडप्यांमध्ये संघर्ष निर्माण करीत आहे. चीनच्या शिचुआन प्रांतात महिन्यात 300 हून अधिक जोडप्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसमुळे बहुतेक लोक त्यांच्या घरात कैद झाले आहेत. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत, ही परस्परांमधील भांडणे इतकी विकोपाला गेलेली आहेत की, पती-पत्नीमधील नाते संपुष्टात य़ेऊन जोडपी घटस्फोट घेत आहेत.
डाऊझौ भागातील मॅरेज रेजिस्ट्रीचे मॅनेजर लू शिजुन म्हणाले की , शेकडो जोडपी त्यांचे लग्न मोडण्याचा विचार करत आहेत. घटस्फोटासाठी दाखल केलेल्या याचिकांमध्येही त्याचा परिणाम दिसून येतो. आतापर्यंत घटस्फोटासाठी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत.
चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नी गरजेपेक्षा बराच वेळ एकत्र रहात असल्याने त्यांच्यातील मतभेदांत वाढ होत आहे. ज्याचा त्यांच्या नात्यावरही नकारात्मक प्रभाव पडतो य आणि त्याची परिणती घटस्फोटात होत आहेत. घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
कोरोना व्हायरसमुळे कार्यालये एका महिन्यासाठी बंद होते. यामुळे घटस्फोटाची प्रलंबित प्रकरणे वाढत आहेत.त्याचवेळी , कोरोनामुळे इटलीच्या लॉक डाऊनमुळे, इंटरनेट डेटाची मागणी येथे वेगाने वाढली आहे.चीननंतर इटलीत सर्वाधिक कोरोनाने संक्रमित लोक आहेत यामुळे येथे इंटरनेटचा वापर 70 टक्क्यांनी वाढलेला आहे.