कोरोना मृतांच्या संख्येवरून चीन संशयाच्या भोवऱ्यात
Mar 29, 2020, 17:46 IST
अस्थिकलश मोजणीतून खरे रहस्य उलगडले ?
चीन , इटली आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोनाच्या तांडवामुळे मृतांची संख्याही निरंतर वाढत आहे. यापूर्वी चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक होते. आता तर अमेरिका त्यात प्रथम क्रमांकावर आली आहे, परंतु अलीकडेच चीनच्या वुहान येथील स्मशानभूमीत दोन दिवसात सुमारे 5000 हजार कलश (अस्थी कलश) ठेवले गेले असल्याचे स्पष्ट होत आहे. या वृत्तामुळे चीनने जाहीर केलेल्या मृत्यूच्या संख्येवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आधीच कोरोनाव्हायरस बद्दल जगाच्या प्रश्नांनी चीनला घेरलेले होते त्यातच आता इतक्या मोठ्या प्रमाणात हाडांच्या कलशांच्या डिलीव्हरी मुळे चीनवर शंका घेणे अधिकच वाढले आहे.
एका इंग्रजी पोस्टने चीनच्या स्थानिक माध्यमांच्या हवाल्यात म्हटले आहे की , कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये मरण पावलेल्या लोकांची अधिकृत संख्या संशयित आहे. कारण चिनी सोशल मीडियावर अनेक लोक व त्यांच्या नातेवाईकांची अस्थी कलश वाहून नेणारी छायाचित्रे खूप व्हायरल होत आहेत. चिनी स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, वुहान येथील स्मशानभूमीत दोन दिवसात पाच हजार अस्थी पुरण्यात आलेली आहेत. तथापि , किती अस्थी राखेत जमा झाल्येत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 3 ,300 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे, तर दोन दिवसांत तब्बल पाच हजार हाडांच्या कलशांची डिलीव्हरी ही काही वेगळीच गोष्ट सांगत आहे. तथापि, वुहानमधील स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास साफ नकार दिला आहे. कोरोनामुळे आजपर्यंत जगभरातून 30,800 पेक्षा जास्त लोक मरण पावलेले आहेत.
चीनमधील दोन कोटी सिमकार्ड सध्या बंद आहेत, त्यावरूनही उलट सुलट चर्चा सुरु असून, चीन कोरोना रुग्णाचा आकडा लपवत असल्याचा आरोप होत आहे.
चीनमधील दोन कोटी सिमकार्ड सध्या बंद आहेत, त्यावरूनही उलट सुलट चर्चा सुरु असून, चीन कोरोना रुग्णाचा आकडा लपवत असल्याचा आरोप होत आहे.