जिल्हा परिषद  विद्यार्थ्यांना मिळताहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचे धडे

सांजा शाळेतील शिक्षिका सोनाली गजधने यांचा स्तुत्य उपक्रम
 
sd

उस्मानाबाद - कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षापासून शिक्षणाचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे ‘शाळा बंद शिक्षण सुरू’ असा ऑनलाईन ज्ञानदानाचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला होता. परंतु तरीही सर्व विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता, हि बाब लक्षात घेऊन तालुक्यातील सांजा येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षका सोनाली गजधने यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणाचा कौतुकास्पद उपक्रम सुरू केला आहे.

शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ऑनलाईन शिक्षणात अनेक विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल फोन नसल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. त्यामुळे गजधने यांनी मोबाईल असणारे व नसणारे असे वर्गीकरण केले. त्यानंतर सर्व पालकांशी फोनद्ववारे आणि प्रत्यक्ष भेटून नियोजन केले. त्यानुसार मोबाईल असणारे विद्यार्थी ऑनलाइन तर मोबाईल नसणारे विद्यार्थी गटागटाने कोरोनाच्या नियमांचे पालन करून ऑफलाईन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना योग्य असे ज्ञानदान होत आहे. शिक्षिका गजधने यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालक समाधान व्यक्त करीत आहेत. तर मुख्याध्यापक रामहारी सुरवसे यांनी गजधने यांचे कौतुक केले आहे.


नवे प्रयोग करायला हुरूप येतो...

गावातील पालकांचं सहकार्य मला वेळोवेळी भेटतं. त्यात विद्यार्थी सुध्दा शिक्षणाची गोडी असणारे आहेत. शेवटी आपल्या विद्यार्थींना चांगलं शिक्षण देणं हे प्रत्येक शिक्षकांच कर्तव्य आहे. मला माझे सर्व सहकारी आणि मुख्याध्यापक वेळोवेळी पाठींबा देतात. त्यामुळेच असे प्रयोग करायला नवीन हुरूप येतो. म्हणूनचं मला शिकवताना आत्मविश्वास मिळतो, अशी प्रतिक्रिया शिक्षिका सोनाली गजधने यांनी यावेळी व्यक्त केली.

From around the web