उस्मानाबाद जिल्ह्यातील बोगस डॉक्टराकडून तरुणाची फसवणूक 

किडनी निकामी झालेल्या रुग्णाला किडनी देतो म्हणून १ लाख ७० हजाराला घातला गंडा
 
ds
एकुलता एक मुलाला वाचवण्यासाठी शेतकरी बापाची परवड

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टराला बार्शी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. किडनी निकामी झालेल्या रुग्णाला किडनी देतो म्हणून १ लाख ७० हजाराला या बोगस डॉक्टराने गंडा घातला आहे. एकुलता एक मुलाला वाचवण्यासाठी शेतकरी बापाची या बोगस डॉक्टराने  फसवणूक केली आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा बावी येथील नितीन सुतार या तरुणांची गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या नात्यातील प्रदीप  सुतार  याने मी पेशाने डॉ असून तुला  किडन्या सरकारी योजनेतून मिळवून देतो असे सांगत त्या तरुण व तरुणांच्या वडीला कडून 1 लाख 70 हजार रुपय देखील घेतले मात्र पैसे देऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रमोद हा किडनी ही देत नाही आणि पैसे ही परत करत नसल्याने हताश झालेल्या नितीन च्या वडिलांनी या प्रदीप चा शोध घेतला असता तो डॉक्टर च नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. 

d

 एक नव्हे दोन वर्षे भर नव्हे तर हा प्रदीप  नावाचा भामटा गेलो 12 वर्षा पासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले असता त्यांनी प्रदीपशी संपर्क करून पैसे मागितले असता मी डॉक्टर च नाही मी तुला पैसेच देऊ शकत नाही तुला काय करायचे ते करून घे असा इशारा त्यांनी नितीन च्या वडिलांना दिला असता त्यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली व बोगस डॉक्टर प्रदीप सुतार वर फसवणूक करणे असे अनेक गंभीर कलमा सह गुन्हा दाखल झाला असून बार्शी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. 

 शेतकरी असणाऱ्या नितीन च्या वडिलांची नितीन ला वाचवण्यासाठी चांगलीच परवड होत असून त्याचे रक्त डायलिसिस करण्यासाठी सरकारी दवाखान्यात च आठवडा 2 ते 3 हजार रुपये खर्च येत असून आता मुलाला वाचवावे कसे असा प्रश्न त्यांना पडला असून बोगस प्रदीप सुतार ला नुसती अटक होऊन चालणार नाही तर पोलिसांनी त्याच्या कडील असणारे पैसे परत मिळवून दयावे अशी मागणी ते करत आहेत. दरम्यान बोगस प्रदीप सुतार गेली बारा वर्षा पासून बार्शी कोल्हापूर सांगली या परिसरात डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होता . या काळात त्याने अनेक जणांना फसवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत  असून त्या दृष्टीने च तपास सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत 


 

From around the web