टेम्पो चालकास येरमाळा पोलिसांनी पाच हजार एंट्री फी मागितली 

चालकाचा पोलीस स्टेशनमधील झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न ( व्हिडीओ ) 
 
टेम्पो चालकास येरमाळा पोलिसांनी पाच हजार एंट्री फी मागितली

येरमाळा -    लेबर घेऊन जाणाऱ्या एका टेम्पो चालकास येरमाळा पोलिसांनी पाच हजार एंट्री फी मागून टेम्पो अडवून ठेवल्याने टेम्पो चालकाने पोलीस स्टेशनमधील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर शिस्तभांगाची कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी सांगितले. 

कामावर मजूर घेऊन जणारा एक टेम्पो जात असताना, येरमाळा पोलिसांनी हा टेम्पो अडवला आणि त्या टेम्पो चालकास पाच हजार एंट्री फी मागितली. पाच हजार देण्यास त्या टेम्पो चालकाने नकार देताच तो टेम्पो पोलीस स्टेशनजवळ आणण्यात आला आणि तीन तास झाले तरी अडवून ठेवण्यात आला. 

त्या टेम्पो चालकाने अनेक विनंत्या करूनही टेम्पो सोडून न दिल्यामुळे तो टेम्पो चालक निराश झाला आणि पोलीस स्टेशनमधील झाडावर  चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला." एक तर कोकरे राहील किंवा आम्ही राहू"  म्हणत तो टेम्पो चालक आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत असताना, काही पोलिसांनी प्रसंगावधान राखून झाडावर चढले आणि खाली उतरावले. 

या  संपूर्ण  प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल  झाला आहे. या संदर्भात पोलीस अधीक्षक  राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून, दोषी पोलिसांवर शिस्तभांगाची कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. 

येरमाळा पोलीस स्टेशनमधील काही पोलिसांची खाबुगिरी सुरु असून, वाहन चालकांना उघड उघड पैश्याची मागणी होत असल्याने अनेकजण त्रस्त झाले आहेत. 

From around the web