विद्यार्थ्यास शाळेत पाठविण्याबाबत पालकांची लेखी संमती आवश्यक
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळा ( इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग) उद्या सोमवारपासून सुरु होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शाळेतील शिक्षकांची RAPID ANTIGEN TEST घेण्यास सुरूवात करण्यात आली आहे तसेच विद्यार्थ्यास शाळेत पाठविण्याबाबत पालकांची लेखी संमती आवश्यक असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी कळवले आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करणे बाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुषंगाने संबंधित शिक्षकांची दिनांक 17 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2020 या कालावधीत शासकीय केंद्रात covid-19 ची मोफत वैद्यकीय तपासणी करणे बाबत कळविलेले आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी(मा) गजानन सुसर यांनी दिली आहे.
आरोग्य विभाग उस्मानाबाद यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये RTPCR चाचणी प्रयोगशाळेची क्षमता 200 पर्यंत मर्यादित असल्यामुळे दिनांक 22 नोव्हेंबर 2020 पर्यंत सर्व शिक्षकांची RTPCR चाचणी करणे शक्य होणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. तसेच दिनांक 18 नोव्हेंबर रोजी
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या VC मध्ये RTPCR चाचणी संदर्भात ही अडचण जिल्ह्याच्या वतीने आयुक्त (शिक्षण) यांनी RAPID ANTIGEN टेस्ट करण्यासाठी परवानगी दिली आहे, शिक्षणाधिकारी(मा) सुसर यांनी सांगितले.
तसेच दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार ज्या शिक्षकांना covid-19 सदृश्य लक्षणे आहेत त्यांची थेट RTPCR चाचणी करावी. ज्या शिक्षकांची RAPID ANTIGEN चाचणी नकारात्मक आली आहे, मात्र त्यांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आहेत किंवा पल्स ऑक्सिमीटर मीटर रिडींग 95 पेक्षा कमी आहे अशा शिक्षकांची RTPCR चाचणी तात्काळ करावी. ICMR च्या सूचनाप्रमाणे RTPCR व RAPID ANTIGEN चाचण्या घ्याव्यात, असे श्री सुसर यांनी सांगून शाळा सुरू झाल्यानंतर सुद्धा ज्या शिक्षकांना सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे दिसतात त्यांची चाचणी तातडीने करण्यात यावी. covid-19 चाचणी नकारात्मक आली तरी येणार्याा काळात covid-19 संसर्ग होऊ शकतो म्हणून शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कोणतेही लक्षण अंगावर न काढता चाचणी करून घ्यावी. तालुका आरोग्य अधिकारी यांनी भविष्यातही याबाबत लक्ष द्यावे, असे त्यांनी निर्देशित केले आहे.
विद्यार्थ्यास शाळेत पाठविण्याबाबत पालकांची लेखी संमती घ्यावी. आजारी असलेल्या मुलांना पालकांनी शाळेत पाठवू नये. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने घरी राहून देखील अभ्यास करता येईल.पालकांच्या संमतीपत्राबाबत जिल्ह्यामध्ये एकवाक्यता राहावी म्हणून संमतीपत्राचा नमुना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात उपलब्ध आहे. त्या नमुन्यामध्ये पालकांचे संमतीपत्र घ्यावे. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या RTPCR चाचण्या व RAPID ANTIGEN चाचण्या याबाबतची माहिती विहित प्रपत्रात शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक) कार्यालयात सादर करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) गजानन सुसर यांनी केले आहे.
हेही वाचा