चिंताजनक : इंग्लंड रिटर्न तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह 

 
चिंताजनक : इंग्लंड रिटर्न तरुणाचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह

उस्मानाबाद - उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या कमी झालेली असताना शनिवारी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५  तरुणाचा  कोरोना रिपोर्ट  पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर  उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या तरुणाच्या कोरोना स्टेनच्या चाचणीसाठी नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. 

 एक ३५ वर्षीय तरुण इंग्लंडहून  उस्मानाबादेत परतल्यानंतर त्याची  रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली असता, त्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला, त्याला सर्दी, खोकला अशी लक्षणे होती, असे सांगण्यात आले.त्याच्यावर उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा तरुण कोणत्या लोकांच्या संपर्कात आला, याची शोध मोहीम सध्या सुरु आहे.  

२३ नवे रुग्ण, १२ जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात शनिवारी (दि.२) कोरेानाचे नवे २३ रूग्ण आढळून आले आहेत. तर १२ जणांना डिस्चार्ज मिळाला. जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची एकूण संख्या १६३८४ रूग्ण झाली असून,त्यापैकी १५६७२ रुग्ण कोराेनामुक्त झाले आहेत. कोराेनाने अातापर्यंत ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी जिल्ह्यात २३ कोरेाना रूग्ण आढळले असून, त्यात उस्मानाबाद तालुक्यात ८,तुळजापूर, लोहारा व भूम तालुक्यात प्रत्येकी १, कळंब तालुक्यात ७, वाशीमध्ये ३ व उमरगा तालुक्यात २ रिग्ण आढळले आहेत. परंडा तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात सध्या कोरेानावर उपचार घेणाऱ्यांची संख्या १४७ झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यातच गंभीर रुग्णांचे प्रमाणही तुलनेने अधिक असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत सध्या कोरेानाच्या गंभीर रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अधिक काळजीपूर्वक उपाययोजना राबविल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या १४७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी २१ जण आयसीयूमध्ये असून, ३३ जणांना ऑक्सिजन सुरू आहे. ३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. म्हणजे ५४ रुग्ण गंभीर स्थितीत आहेत.

जिल्ह्यातील कोेरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोराेनाची भीती संपुष्ठात आली होती. परिणामी नागरिकांनी स्वत:च्या तसेच सामाजिक आरोग्याकडे दुर्लक्ष सुरू केले. मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्स न पाळणे, यामुळे हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ऑक्टोबरपासून रुग्णसंख्या प्रत्यक्षात कमी दिसत असली तरी तपासणी करण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. अत्यंत गंभीर प्रकृती झाल्यानंतर रूग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. त्यामुळे उपचारावर मर्यादा येऊन रूग्णाचे मृत्यू ओढवत आहेत.

कोरोना मीटर 

  • उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत आढळून आलेले रुग्ण - १६३८४
  •  बरे होवून  गेलेले रुग्ण - १५६७२
  •  एक्टीव्ह रुग्ण - १४७
  •  एकूण मृत्यू - ५६५

From around the web