चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात ७ एप्रिल रोजी ४६८ कोरोना पॉजिटीव्ह ,पाच मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या ३०४५
Wed, 7 Apr 2021

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ७ एप्रिल ( बुधवार ) रोजी तब्बल ४६८ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात पाच कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ३०४५ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार १३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १९ हजार ३५३ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६१७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा