चिंताजनक  : उस्मानाबाद जिल्ह्यात ५ एप्रिल रोजी ४२३ कोरोना पॉजिटीव्ह 

जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २५७९
 

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ५ एप्रिल ( सोमवार ) रोजी तब्बल ४२३ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर १९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात दोन कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला.  जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २३५३ झाली आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार १२८ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १८ हजार ९४७ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६०४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

From around the web