चिंताजनक : उस्मानाबाद जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी ४१५ कोरोना पॉजिटीव्ह ,आठ मृत्यू
जिल्ह्यात ऍक्टिव्ह कोरोना रुग्णाची संख्या २७२९
Apr 6, 2021, 22:13 IST

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज ६ एप्रिल ( मंगळवार ) रोजी तब्बल ४१५जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे तर २४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच दिवसभरात आठ कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २७२९ झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार ४५३ रुग्णाची नोंद झाली असून, पैकी १९ हजार १९० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६१२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर रिपोर्ट पाहा