पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला सन्मान पुरस्कार

 
s
     प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना 31 मे रोजी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार

धाराशिव :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी दि. 31 मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्याबाबत शासन निर्णयान्वये निर्देश प्राप्त झालेले आहेत.

ग्रामपंचायत स्तरावर दि.27 मे 2023 सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत इच्छुक महिलांचे अर्ज स्वीकारावेत.  प्राप्त अर्जाची दररोज गुगल शीटमध्ये संबंधित पर्यवेक्षिका व विस्तार अधिकारी (सा) यांनी नोंदणी करावी. दि.28 मे 2023 रोजी गावस्तरीय समितीची बैठक आयोजीत करुन गुणवत्तेनुसार दोन महिलांची निवड करुन त्यांची नावे ग्रामपंचायत बोर्डवर प्रसिध्द करावेत. निवड समितीचे इतिवृत्त ठेवावे. निवडी संदर्भात तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी. दि.29 मे 2023 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत यापुर्वी दिलेल्या विहीत नमुन्यात प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तयार करुन त्यावर नावे लिहावीत. प्रमाणपत्राचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता घ्यावी. निवड झालेल्या महिलांना ग्रामसेवकांनी दि.30 मे 2023 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत निवडीचे पत्र द्यावे. दि.31 मे 2023 रोजी पुरस्कार समांरभाचे आयोजन करुन पुरस्कारांचे वितरण करावे आणि त्याची व्यापक स्वरुपात स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्दी देण्यात यावी.

सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ आणि रोख रक्कम ( 500 रुपये प्रती महिला) असे या पुरस्कराचे स्वरुप आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महिला, महिला ह्या त्याच ग्रामपंचायती किंवा गट ग्रामपंचायतीतील रहिवासी असावी, त्यांचे कार्य हे त्याच ग्रामपंचायती किंवा गट ग्रामपंचायतीमध्ये केलेले असावे, महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 3 वर्ष कार्य केलेले असावे, पुरस्कार प्राप्त महिला या सात वर्षानंतर या पुरस्कारासाठी पुन्हा पात्र ठरतील, महिलांच्या समस्या व प्रश्नाबाबत जाणीव व संवेदनशीलता असावी, सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असावा, महिला अत्याचारामध्ये समाविष्ट नसावी, बाल विवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकीत्सा प्रतिबंध, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, महिला स्वंय सहाय्यता बचत गट, आरोग्य, साक्षरता, मुलीच्या शिक्षणासाठी पुढाकार या सारख्या कार्यामध्ये उत्स्फुर्तपणे पुढाकार घेतलेला असावा.

इच्छुक महिलेने स्वत:ची वैयक्तिक माहिती व केलेल्या कार्याच्या तपशिलासह संबंधित ग्रामपंचायतकडे  दि.27 मे 2023 पर्यत अर्ज सादर करावा.  ग्रामपंचायत स्तरावर दोन कर्तबगार महिलांची निवड करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक, पोलिस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांची समिती गठीत करावी. ज्या ग्राम पंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी यांचा कार्यकाल समाप्त झालेला असेल किंवा ग्रामपंचायत बरखास्त झालेली असेल,अशा ठिकाणी  प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन महिलांची निवड करण्यात येणार आहे. तरी याचा इच्छुक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी केले आहे.

               

From around the web