उस्मानाबादेतील बलात्कार पीडित महिलेच्या नवऱ्याची आत्महत्या 

सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे 

 
उस्मानाबादेतील बलात्कार पीडित महिलेच्या नवऱ्याची आत्महत्या
उस्मानाबाद शहरातील बार्शी नाका  परिसरातील एका विवाहित महिलेवर पोलीस कर्मचारी  भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून  वारंवार अत्याचार केला  होता. त्यामुळे सदर महिलेने  २ मार्च रोजी आत्महत्या केली होती. आता त्याच पीडित महिलेच्या नवऱ्याने रविवारी सायंकाळी आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. 

उस्मानाबाद - पोलिसाने बंदूक दाखवून वारंवार अत्याचार केल्यामुळे शहरातील बार्शी नाका परिसरातील  एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी हरीभाऊ भास्कर कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. पीडित महिलेच्या नवऱ्याने रविवारी सायंकाळी टाका ( ता. औसा ) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  त्यांनी एक सुसाईड लिहिली असून,त्यात तिघांची नावे  आहेत. 

शहरातील बार्शी नाका परिसरात  राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने  2 मार्च रोजी सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली होती.सुसाईड नोटमध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार  केल्याचे नमूद केले होते. यावरुन संबंधीत पोलीसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यास बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. 


नेमके प्रकरण काय ? 

उत्तम नारायण शिंदे ( वय ४५ ) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी  पाच वाजण्याच्या सुमारास औसा  तालुक्यातील टाका येथे - गुळखेडा रस्त्यावरील जटे  यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. 

उत्तम शिंदे यांना  दोन बायका होत्या. दुसऱ्या बायकोचे पोलीस कर्मचारी  हरीभाऊ भास्कर कोळेकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून नवरा बायकोचे भांडण  होत होते. यातून पीडित महिला त्रासून गेली होती. मात्र पोलिस कर्मचारी कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याने आपण आत्महत्या केल्याची सुसाईड नोट  तिने लिहिली होती. या प्रकरणी पोलीसानी पोलीस कर्मचारी  हरीभाऊ भास्कर कोळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली होती. 
 

सुसाईड नोटमध्ये तिघांची नावे 

आत्महत्या करण्यापूर्वी उत्तम नारायण शिंदे यांनी एक सुसाईड न लिहिली असून त्यात तिघांची नावे आहेत. माझ्या मृत्यूला अमोल सुधाकर निकम, मिथुन सुधाकर निकम, सुधाकर ज्योती निकम हे तिघे जबाबदार असल्याचे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. 

पोलीस त्रास देत असल्याची चर्चा 

मयत उत्तम शिंदे यांचे बार्शी रोड्वर  मोबाईल शॉपी आहे. बायकोने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी पोलीस कर्मचारी कोळेकर यास पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. मात्र याप्रकरणी काही पोलीस मोबाईल शॉपीवर जावून  शिंदे यांना त्रास देत होते. त्यामुळे त्यांनी गावाकडे पळ काढला. 

गावी टाका ( ता. औसा  ) येथे जाऊन उत्तम शिंदे  यांनी शेवटी गळफास  घेऊन आत्महत्या केली. या संपूर्ण  प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

From around the web