धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नाकडे उपमुख्यमंत्री फडणवीस लक्ष देणार का ? 

 
s

धाराशिव  - राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या १६ जून ( शुक्रवारी ) धाराशिवच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करणार आहेत. ते या दौऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्य  प्रश्नाकडे  लक्ष देणार का ? असा धाराशिवकरांचा प्रश्न आहे. 

धाराशिवला २३६ खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय, ६० खाटांचे स्त्री रुग्णालय आणि २० खाटांचे क्षय रुग्णालय आहे. हे  तिन्ही  रुग्णालयाची स्थावर आणि जँगम मालमत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास निशुल्क वापरण्यास देण्यात आली आहे. तसेच या तिन्ही रुग्णालयात काम करणारे कर्मचारी देखील वैद्यकीय महाविद्यालयास जोडण्यात आले आहे होते. त्यास आता पुन्हा दोन वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गतवर्षी सुरु झाले होते. एमबीबीएसचा  अभ्यासक्रम साडेचार वर्षाचा असतो आणि एक वर्षे इंटर्नशिप असते.  दुसऱ्या वर्षी मुले गेले आहेत पण जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक सोयी सवलती उपलब्ध नाहीत, तसेच तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. 

जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या  Pm म्हणजे शवविच्छेदन एमएलसी किंवा एमबीबीएस डॉक्टरकडून केले जाते.क्लिष्ट शववि्छेदनसाठी तज्ञ डॉक्टर म्हणजे  md FMT ची गरज असते.  एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षी FMT हा विषय असतो. एमडी  FMT कडूनच शवविच्छेदन  व्हायला हवे पण तसा तज्ञ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध नाही. शासनाने हे पद तातडीने भरण्याची गरज आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास  स्वतंत्र इमारत नाही, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उद्या जागेची पाहणी करणार आहेत , हे करत असताना आता नवीन टेक्निकल स्टॉप भरती करावा, अशी मागणी  आहे. 

From around the web