अणदूर : विश्व हिंदू परिषदेचे भुजंग घुगे यांचे निधन

 
 अणदूर  : विश्व हिंदू परिषदेचे भुजंग घुगे यांचे निधनअणदूर - विश्व हिंदू परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आणि अयोध्या श्रीराम मंदिर निर्माण मंदिर ट्रस्टचे सदस्य भुजंग घुगे यांचे कोरोनामुळे लखनौ  येथील एका  हॉस्पिटलमध्ये दसऱ्या दिवशी ( रविवार ) निधन झाले, त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अणदूर गावावर शोककळा पसरली आहे. 


दिवंगत भुजंग घुगे हे विश्व हिंदू परिषदेचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. अविवाहित राहून त्यांनी ४० वर्षे  हिंदू धर्मप्रचारक म्हणून काम पाहिले. विश्व हिंदू परिषदेचे दक्षिण भारत धर्मप्रचारक म्हणून ते कार्यरत होते. १९९०  मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रामध्ये भुजंग घुगे यांनी सहभागी झाले होते. 

 अणदूर  : विश्व हिंदू परिषदेचे भुजंग घुगे यांचे निधन


गेल्या वर्षभरापासून  त्यांचे वास्तव्य अयोध्यामध्ये होते. अयोध्या श्रीराम मंदिर निर्माण मंदिर ट्रस्टचे सदस्य असलेले भुजंग घुगे श्रीराम मंदिर उभारणीच्या कामात मदत करीत  होते. या कामात व्यस्त असताना त्यांना कोरोनाने घेरले, त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून लखनौ  येथील केजीएमसी कोरोना रिसर्च सेंटर मध्ये उपचार सुरु होते. दसऱ्या दिवशी ( रविवार ) सायंकाळी सहा वाजता प्राणज्योत मालवली. 


भुजंग घुगे यांच्या निधनाचे वृत्त समजताच अणदूर गावावर शोककळा पसरली आहे. आपले संपूर्ण आयुष्य विश्व हिंदू परिषद आणि अयोध्या मंदिर निर्माण कार्यात घालवणाऱ्या  एका कार्यकर्त्याचे  कोरोनामुळे  निधन झाल्याने अनेकांनी शोक प्रगट  केला आहे. 


From around the web