उमरग्यात नाकाबंदी दरम्यान ७९ किलो गांजासह वाहन जप्त, एक अटकेत 

 
a

उमरगा: उमरगा पोलीस वाहनांची तपासणी करताना एका वाहनात ७९ किलो आढळून आला असून,की याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. 

कोविड- 19 साथीच्या पार्श्वभुमीवर उभारण्यात आलेल्या तलमोड, ता. उमरगा येथील आंतरराज्यीय तपासणी नाक्यावर दि. 03.05.2021 रोजी 23.55 वा. उमरगा पोलीस वाहनांची तपासणी करत होते. यावेळी अशोक लेलँड- दोस्त एम.एच. 14 जी 6515 या वाहनाची पोलीसांनी तपासणी केली असता प्रकाश नरेंद्र बेहरा , रा. पुणे हा त्या वाहनातून गांजा या मादक वनस्पतीची  पाने, फुले, फळे असे एकुण 78.73 कि.ग्रॅ. गांजा अवैधरित्या वाहुन नेत असल्याचे आढळले. यावरुन उमरगा पो.ठा. सपोनि- सिध्देश्वर गोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन एन.डी.पी.एस. कायदा कलम- 20 (ब) अंतर्गत गुन्हा आज दि. 04 मे रोजी नोंदवला आहे.  

From around the web