वाशी : १८ हजार रुपयांची लाच घेताना मुद्रांक विक्रेता चतुर्भुज
उस्मानाबाद - तक्रारदाराच्या भावाची जमीन नावाने खरेदी खत करण्यासाठी २५ हजार लाचेची मागणी करून १८ हजार लाच घेताना वाशी येथील एका मुद्रांक विक्रेत्यास एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार यांच्या भावाची जमीन तक्रारदार यांच्या नावाने खरेदी खत करण्यासाठी आरोपी नामे अशोक विनायक चेडे, मुद्रांक विक्रेते, रा. शिवाजी नगर वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद यांनी तक्रारदार याना 25000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती १८ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. याबाबत पो स्टे वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकर शेख, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर, व चालक करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००)यांनी केले आहे.