वाशी पोलीसांच्या रात्रगस्ती दरम्यान 6.19 क्विंटल गांजा जप्त

 
वाशी पोलीसांच्या रात्रगस्ती दरम्यान 6.19 क्विंटल गांजा जप्त

वाशी: वाशी पो.ठा. चे सपोनि अशोक चौरे, पोना- जगताप हे पथकासह 17 मार्च रोजी 01.00 वा. सु. पारगांव येथे रात्रगस्तीस असतांना सुतार गल्ली येथील रस्त्यावर गर्दी जमलेली दिसली. तेथील लोकांना गर्दीचे कारण विचारता लोकांनी सांगीतले की, बाजूस उभ्या असलेल्या वाहन क्र. ए.पी. 36 टीबी 1652 चे चालक व सहायक हे लोकांना पाहुन पळुन गेले आहेत. 

यावर पथकाचा संशय बळावल्याने पिकअपची तपासणी केली असता हौद्यामध्ये टारपोलीनच्या खाली नारळ असुन त्याखालील पॉलीथीनच्या खाली तागाच्या 28 पोत्यांतील पुडक्यांत गांजा अंमली पदार्थ आढळला. पथकाने ते वाहन वाशी पो.ठा. येथे नेउन तहसीलदार, वाशी व वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक तसेच दोन शासकीय पंचांच्या समक्ष पिकअप मधील 28 पोत्यांतील एकुण 619.7 कि.ग्रॅ. गांजा व नमूद पिकअप वाहन जप्त केले आहे.

            यावरुन सपोनि- अशोक चौरे यांनी 17 मार्च रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाहन क्र. ए.पी. 36 टीबी 1652 च्या अज्ञात चालक व सहायकाविरुध्द एनडीपीएस ॲक्ट कलम- 20 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोनि- श्री उस्मान शेख हे करत आहेत. 

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 3 व्यक्तींवर गुन्हे दाखल

वाशी: अवैध गुटखा बाळगणाऱ्यांविरुध्द 17 मार्च रोजी वाशी शहरातील 3 वेगवेगळ्या पानस्टॉल वर छापे टाकण्यात येउन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलला अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यां खालील 3 व्यक्तींवर भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन कलम व वाचन अधिनियम अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत.

यात पहिल्या घटनेत सुतार गल्ली येथील बप्पा बाबासाहेब येताळ हे आपल्या ‘अनित पानस्टॉल’ मध्ये 2,387 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले दुसऱ्या घटनेत चेडे गल्ली येथील कैलास पांडुरंग चेडे हे आपल्या ‘शिवशक्ती पानस्टॉल’ मध्ये 1,830 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले तिसऱ्या घटनेत कुंभारवाडा येथील समीर हनिफ तांबोळी हे आपल्या ‘भाईभाई पानस्टॉल’ मध्ये 908 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले अन्न सुरक्षा पथकास आढळले. यावरुन अन्न सुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web