उस्मानाबाद जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी लसीकरण मोहीम 

शहरी १३ तर ग्रामीण भागातील ७ लसीकरण केंद्रावर १ हजार ७५० जणांना मिळणार कोविशिल्ड लसीचा डोस
 
s

उस्मानाबाद  - जिल्ह्यातील १८ वर्षावरील नागरिकांना ऑनलाईन व ४५ वर्षावरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने १ हजार ७५० कोविशिल्ड लसीचे डोस दि.७ सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहेत.

शहरी भागातील १३ व ग्रामीण भागातील ७ लसीकरण केंद्रावर १८ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. तर ४५ वर्षाच्यावरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने कोविशिल्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट व मतदान कार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सोबत बाळगावे. या केंद्रावर १८ वर्षावरील वयोगटातील नागरिक, जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती व दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. तर १८ वर्षावरील लाभार्थ्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. अशाच लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार असल्यामुळे इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये.

शहरी भागातील लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे - ग्रामीण रुग्णालय मुरूम, सास्तूर, तेर, वाशी, भूम, उपजिल्हा रुग्णालय उमरगा, परंडा, तुळजापूर, कळंब शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय उस्मानाबाद, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद व पोलिस हॉस्पिटल उस्मानाबाद या लसीकरण केंद्रांमध्ये सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी 
स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. तर ग्रामीण भागासाठी ७ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे ती लसीकरण केंद्र पुढीलप्रमाणे - जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर व जिल्हा परिषद प्रशाला उमरगा, फुले आंबेडकर वाचनालय कळंब, समर्थ नगर रोड परंडा, भारत माता मंदिर लोहारा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवशक्ती नगर वाशी व ज्ञानदान विद्यालय मुरूम ही केंद्र आहेत. तर या केंद्रावर सकाळी ९ वाजल्यापासून ते दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. 

ऑनलाईन नोंदणी करून स्लॉट्स बुक केलेल्या नागरिकांसाठी आणि ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छीत असणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायची आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. तसेच लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोस संख्येच्या प्रमाणात टोकन वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत नगर पालिका व पोलिस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी व लसीकरणामध्ये मदत करावी. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस द्यावी, असे आवाहन जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी केले आहे.

From around the web