उस्मानाबादेत नकली सोने विकण्याच्या प्रयत्नात असलेले दोन भामटे अटकेत

 
s

उस्मानाबाद -  पुण्यातील दोन भामटे उस्मानाबादेत नकली सोने विकून फसवणूक करीत असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना जेरबंद करून मुद्देमाल जप्त केला आहे.


पुणे येथील दोन तरुण उस्मानाबाद येथे नकली सोने विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पथकास मिळाली. यावर स्था.गु.शा. चे पोनि गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि मनोज निलंगेकर, पोना- दिपक लाव्हरे पाटील, संतोष गव्हाणे, पोकॉ- अशोक ढगारे यांच्या पथकाने दि. 05.05.2021 रोजी 14.00 वा. उस्मानाबाद शहरालगतच्या महामार्गावरील साई हॉटेल समोर सापळा लावला.

 यावेळी लॉकडाऊन काळात सुझूकी स्विफ्ट कार क्र. एम.एच. 12 एसएल 6376 मधून पुणे जिल्ह्यातून विनापरवाना उस्मानाबाद येथे आलेले 1)दिलीप प्रतापसिंग सुरडकर 2)जब्बार करीम शेख, दोघे रा. पुणे हे दोघे एका ग्राहकास खरे सोने भासवून नकली सोन्याच्या 8 अंगठ्या विक्री करत असतांना आढळले. यावरुन पोलीसांनी त्या दोघांना नकली सोने, दोन स्मार्टफोन व कारसह ताब्यात घेउन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 420, 511, 269, 271, 188, 34 सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना नियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  


फसवणूक

 भुम: काकासाहेब अर्जुन रांजवण, रा. पाथ्रुड, ता. भुम यांना दि. 14- 26.03.2021 दरम्यान आमिष दाखवणारे ई-मेल प्राप्त झाले. त्याची सत्यता न तपासता काकासाहेब यांनी त्या ई-मेलमध्ये सांगीतल्याप्रमाणे तीन मोबाईल क्रमांकांच्या खात्यांवर युपीआयद्वारे वेळोवेळी एकुण- 5,91,500 ₹ रक्कम भरली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे काकासाहेब यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या काकासाहेब रांजवण यांनी दि. 05 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (क) (ड) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


 

From around the web