तीन हजाराची लाच घेताना उस्मानाबादेत दोन खाजगी आर.टी.ओ.एजंट एसीबीच्या जाळ्यात
उस्मानाबाद - येथील आरटीओ कार्यालयात कोणतेही काम दलाला शिवाय होत नसल्यामुळे नाईलाजास्तव दलालांची मदत घ्यावी लागत आहे. हे दलाल येणाऱ्या प्रत्येक ग्राहकास लुटत असून साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी दोन दलालांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडून दि.८ सप्टेंबर रोजी गजाआड केले आहे.
४ हजार ५०० रुपये लाचेच्या रकमेची मागणी करून यापूर्वी दीड हजार रुपयांची लाचेची रक्कम स्विकारल्याचे मान्य करून ३ हजार रुपये लाच रक्कम स्विकारल्याने दोन खाजगी आर. टी.ओ. दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांचे भावाचे नावे असलेल्या टाटा मेगा एक्स एल चारचाकी मालवाहू गाडीचे पुनरनोंदणी करून वाहनाचे आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी तानाजी गोकुळ भोगील ३८ वर्ष, व्यवसाय खाजगी आर.टी.ओ. दलाल, आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद यांनी ४ हजार ५०० रुपयांची लाचेची मागणी करून यापूर्वी १ हजार ५०० रुपये रक्कम स्विकारल्याचे मान्य करून उर्वरित ३ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले आणि संदिप श्रीनिवास सूर्यवंशी, २७ वर्ष, व्यवसाय ऑनलाईन सर्व्हिस सेंटर, आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद. रा. टाकळी बेंबळी यांच्या मार्फतीने ३ हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध आनंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही लास्ट लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल खाडे, प्रभारी अप्परर पोलिस अधीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, उस्मानाबाद येथील पोलिस उप अधिक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक हुलगे यांनी केली. याकामी त्यांना पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर व अविनाश आचार्य यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क साधावा असे आवाहन प्रशांत संपते ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे ( मो. क्र. ८८८८८१३७२०) अशोक हुलगे, (मो. क्र. ८६५२४३३३९७) यांनी केले आहे.
खरी लाच घेणाऱ्या त्या अधिकाऱ्यापर्यंत पोलिस पोहोचणार का ?
आरटीओ कार्यालय परिसरात अनेक दलालांनी दुकाने थाटली असून यांच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया दर महिना कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या दलालांमार्फतच दिली जाते. मात्र ते अधिकारी व कर्मचारी कोण ? हे गुलदस्त्यात राहिले असून खऱ्या लाचखोरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस पोहोचणार का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.