धाराशिव आरटीओ कार्यालयात दोन खासगी दलालांचा कर्मचाऱ्यांप्रमाणे वावर 

दलाल असेल तर कामे फटाफट, ऑनलाइन अर्ज करणाऱ्याला मात्र त्रास 
 
s

धाराशिव  - येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील विविध प्रकारची वाहने रस्त्यावर चालविण्यासाठी अधिकृत परवाना दिला जातो. हे काम फक्त अधिकृत शासकीय अधिकारीच करु शकतात. परंतू या कार्यालयामध्ये शासकीय अधिकाऱ्यांऐवजी ड्रायव्हिंग लायसन काढण्याचे काम पाहणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मेव्हुणा शिवणीकर तर दुसरा ड्रायव्हिंग स्कूलचा चालक जमदाडे या दोन खासगी दलालांचा या कार्यालयात पुन्हा वावर वाढल्याचे दि.३० मे रोजी केलेल्या पडताळणीत समोर आले आहे. त्यामुळे या कार्यालयात त्या सराईत व चटवलेल्या  दोन दलालांसह इतर दलालांनी ताबा घेतला आहे. विशेष म्हणजे याच कार्यालयात संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना देखील ते याबाबत का मुग गिळून आहेत ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

s

धाराशिव येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील २ चाकी, ४ चाकी, ६ चाकी व इतर सर्व प्रकारच्या वाहनांची नोंदणी, नूतनीकरण वाहन चालक , वाहक परवाना देणे, वाहनावर कर्जाचा बोजा चढविणे व कमी करणे आदी कामे केली जातात. ही कामे करण्यासाठी शासनाने अधिकृतरित्या ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. तसेच या कार्यालयात विविध कामांसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती केलेली आहे. तरी देखील या कार्यालयातील सर्वांचा लाडका कर्मचारी यांचा मेव्हुना राजरोसपणे या कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वावर आहे. विशेष म्हणजे शासनाने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यापेक्षा अति रुबाबात तेथील कार्यालयीन कामात हस्तक्षेप करीत आहे. तर दुसरा ड्रायव्हिंग स्कूलचा चालक असणारा दलाल उर्फ अधिकाऱ्यांचा खासमखास असणारा कामामध्ये हस्तक्षेप करताना आढळून येत आहे. हे चित्र अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर घडत असताना देखील अधिकारी मांजराप्रमाणे डोळे बंद करून बसलेले आहेत. बाहेरून येणाऱ्या नागरिकाकडून अधिकच्या पैशांची मागणी करून नागरिकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणामध्ये केली जात असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. दरम्यान शासकीय कार्यालयांमध्ये खाजगी व्यक्ती हस्तक्षेप करीत असेल तर शासकीय अधिकारी गप्प का आहेत ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

d


 या कार्यालयामध्ये शासनाने शासकीय ९ कर्मचाऱ्यांची तर खाजगी कंपनीकडून ५ कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामासाठी नियुक्ती केलेली आहे. तसेच याच कर्मचाऱ्यांच्या मार्फत येणाऱ्या नागरिकांची कामे करून घेतली जात आहेत. या ज्या दोन व्यक्ती आहेत यांचा आणि आमच्या कार्यालयाचा काडी मात्र काहीही संबंध असून ते आमचे कर्मचारी नाहीत. जर कोणता अधिकारी यांना सांभाळून घेऊन पाठीशी घालत असेल तर त्याला तो सर्वस्वी जबाबदार असेल अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

From around the web