येवतीमध्ये अल्पवयीन मुलीवर दोन नराधमाचा अत्याचार 

आरोपीच्या अटकेसाठी रास्ता रोको करण्याचा इशारा 
 
s

नळदुर्ग -  नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येवती गावातील एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अंधाराचा फायदा घेऊन अत्याचार केला. यावेळी आरोपींनी अत्याचार करताना फोटो आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केले. त्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी मुलीचे वडील गेले असता, आरोपींची त्यांना बेदम मारहाण केली. 

या प्रकरणातील एक आरोपी फरार असून , त्यास तात्काळ अटक करावी, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने येत्या २ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या मागणीचे निवेदन नळदुर्ग पोलिसांना देण्यात आले. 

दहावीत शिक्षण घेणारी एक अल्पवयीन मुलगी २६ जुलै रोजी रात्री साडेसात वाजता आपल्या मैत्रीणीकडे पुस्तक देण्याच्या निमित्ताने बाहेर पडली असता, गावातील दोन नराधमांनी अंधाराचा फायदा घेऊन मोटारसायकल वरून उचलून नेले आणि शाळेच्या मागे नेवून आळीपाळीने अत्याचार केला. यावेळी आरडाओरड केलीस तर जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपींनी अत्याचार करताना फोटो आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केले

मुलगी घरी आल्यानंतर तिने सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितले.त्यानंतर मुलीचे वडील जाब विचारण्यासाठी गेले असता, आरोपींनी काठीने आणि  दगडाने मारहाण करून मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. 

याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन नराधमांसह  पाच जणांविरुद्ध नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी यातील मुख्य आरोपी फरार आहे. त्यास तात्काळ अटक करावी, तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने येत्या २ ऑगस्ट रोजी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

From around the web