तुळजापुरात दोन नवजात मृत अर्भके आढळली
Thu, 1 Apr 2021

तुळजापूर - नळदुर्ग रोडवरील कचरा डेपोत दोन नवजात मृत अर्भके आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरूध्द तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग रोडवर कचरा डेपो असून, याठिकाणी एक फूट खड्डा खोदून दोन नवजात बालके पुरण्यात आली होती. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनोज कुमार राठोड,पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे,पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे, घटनास्थळी दाखल झाले आहेत तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अशिष लोकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाँ चंचला बोडके,डॉक्टर श्रीधर जाधव हेही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अनैतिक संबंधातून जन्मलेली ही नवजात बालके असावीत असा कयास बांधला जात असून, या प्रकरणी पोलीस निर्दयी मातेचा शोध घेत आहेत.