बारावी परीक्षेच्या विलंब शुल्काच्या तारखा जाहीर
उस्मानाबाद -लातूर विभागीय मंडळातंर्गत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यानी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी (इ.12वी) एप्रील-मे 2021 नियमित,पुनर्परिक्षार्थी,तुरळक विषय,आणि श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ठ होणाऱ्या तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit घेणारे विद्यार्थी, नियमित आणि विलंब शुल्कासह ऑनलाईन परीक्षेची आवेदनपत्र स्वीकारण्याची मुदत दि.06 फेब्रुवारी-2021 रोजी संपली आहे.
विलंब शुल्कानंतरची अति विलंब/विशेष अतिविलंब / अति विशेष अतिविलंब शुल्काची आवेदनपत्रे ही कनिष्ठ महाविद्यालयाने ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतसस्थळावर भरावयाची आहेत. या आवेदनपत्र भरावयाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत. आवेदनपत्र ऑनलाईन भरल्यानंतर विद्यार्थी आणि प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची मूळ प्रत (Print out) शुल्कासह विभागीय मंडळाकडे सादर करण्यात यावी.
अतिविलंब शुल्क प्रतिदिनी 50 रुपये असून ती दि.08 मार्च-2021,विशेष अतिविलंब शुल्क प्रतिदिनी शंभर रुपये असून ती दि.09 ते 23 मार्च-2021 या कालावधीत भरता येईल, अतिविशेष अतिविलंब शुल्क प्रतिदिनी दोनशे रुपये, असून ती दि. 24 ते 04 एप्रिल- 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांनी भरावेत,असे आवाहन विभागीय मंडळाच्या विभागीय सचिवांनी केले आहे.