श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा

 
 श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा


उस्मानाबाद -  शारदीय नवरात्र महोत्सवात बुधवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली. श्री तुळजाभवानी देवीचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे


श्री तुळजाभवानीची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. 


दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 22 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 23 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 24 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (सोमवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.

 श्री तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा

तत्पूर्वी रात्री चौथ्या माळेच्या दिवशी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्या उपस्थितीत अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात सिंह वाहनावरून  छबिना मिरवणूक काढण्यात आली. From around the web