श्री तुळजाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी

 
 श्री तुळजाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी



तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवात शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस कोजागरी पौर्णिमा असल्याने दिनांक 30/10/2020 रोजी उत्तररात्री 12 वा. तुळजाभवानी मंदिरात पूजेची घाट झाली, महंत, पुजारी, सेवादारी लोक श्री तुळजाभवानी देवी मूर्ती जवळ जाऊन निर्माल्य काढून मानाच्या आरत्या करण्यात आल्या. नंतर श्री तुळजाभवानी मूर्तीस पलंगावरून उचलून सिंहासनावर 12 वाजून 35 मिनीटांनी प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व पंचामृत अभिषेक करून नैवेद्य आरती अंगारा करण्यात आला. दिनांक 31/10/2020 सकाळी 6 वाजता घाट वाजविण्यात येऊन श्री तुळजाभवानी देवीची पंचामृत अभिषेक करुन आरती करण्यात आली, 

 श्री तुळजाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी


शनिवारी श्री तुळजाभवानी मंदिर देवी भक्त आर. आर. किराड यांनी फुलांनी सुंदर सजविले आहे हा सोहळा पाहण्या सारखा आहे.शनिवारी सायंकाळी  सोलापूरच्या जगदंबादेवी  देवस्थानच्या मानाच्या शिवलाड तेली समाजाच्या काठयांचे आगमन झाले. वाजतगाजत जल्लोषात या काठया दीपक संघ माग्रे पुजारी सचिन पाटील यांच्या वाडय़ावर आल्या. तेथे पुजारी सचिन पाटील यांनीही काठयांचे परंपरेनुसार स्वागत केले.  


शनिवारी रात्री दहा वाजता या काठयांसोबत देवीचा कोजागरीचा छबीना पार पडला. तुळजाभवानी मंदिरात येण्यापूर्वी तुळजापूरकरांनी काठयांचे घरासमोर रांगोळया काढून स्वागत केले. सोलापुरातील मानकरी यामध्ये ठळकपणे आपला बाराबंदीचा पेहराव करुन बाजी मारून गेले. या काठ्या प्रत्यक्ष लक्ष्मी स्वरूप मानतात या काठ्या ज्या मार्गाने जातात त्या मार्गावरील स्त्रीया या काठ्यास औक्षन करतात, दुसरे दिवशी या काठ्यासह मंदिरात छबिना काढला जातो, तिसरे दिवशी कल्लोळात स्नान करतात व देवीचे दर्शन घेऊन पुन्हा सोलापुरला प्रस्थान करतात.


यावेळी मंदिर संस्थानचे तहसीलदार श्री सौदागर तांदळे व मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिध्देश्वर इन्तुले यांच्यासह पाळीकर पुजारी मंडळ, उपाध्ये मंडळ, भोपे, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


अधिक छायाचित्रे आमच्या फेसबुक पेजवर पाहा 

https://www.facebook.com/osmanabadlive

From around the web