तुळजापूर | श्री तुळजाभवानी देवीची रथ अलंकार पूजा

तुळजापूर - येथे शारदीय नवरात्र महोत्सवात आज तिसऱ्या माळेच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजेनंतर रथ अलंकार महापूजा बांधण्यात आली.
भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ श्री भवानी मातेस दिला. त्यामुळे आजच्या दिवशी रथ अलंकार अवतार पूजा मांडण्यात येते, अशी आख्यायिका सांगितली जाते.
दररोज नियमित श्री तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. यात, उद्या दि. 10 रोजी मुरली अलंकार महापूजा, दि. 11 रोजी शेषशाही अलंकार महापूजा,दि. 12 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि दि. 13 रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहेत. तत्पूर्वी, काल (शुक्रवार) रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक काढण्यात आली.
तत्पूर्वी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी दवीजीची आरती झाल्या नंतर नारळी भाग आणि पंभज खाद्य, गोविंद विडा दाखवून आरती करण्यात आली . देवीजींच्या मुख्य चादीच्या पादुका सिंह या वाहनामध्ये ठेवून बसवून मंदिरास पूर्ण प्रदर्शना मारण्यात आली . त्यानंतर दुसऱ्या माळेची सांगता झाली. या वेळी उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, तहसीलदार, पुजारी बांधव आदींची उपस्थिती होती.
दुसऱ्या माळेला छबिना
नीज आश्विन शुद्ध दुतीया प्रतीपदा शारदीय नवरत्रौत्सवाची दुसरी माळ काल शुक्रवारी पार पडली. देवीजींची आरती झल्यानंतर नारळी भात , गोविंद विडा दाखवून आरती करण्यात आली .
देवीजींच्या मुख्य चांदीच्या पादुका सिंह या वाहनामध्ये ठेऊन आणि देवीजींची चांदीची मूर्ती वाहनांमध्ये बसवून मंदिरास पूर्ण प्रदक्षिणा मारण्यात आली . त्यानंतर दुसऱ्या माळेची सांगता झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी , नगराध्यक्ष , तहसीलदार , पुजारी बांधव आदींची उपस्थिती होती .