अणदूरजवळ भीषण अपघातात दोन शिक्षिका जागीच ठार

 

अणदूरजवळ भीषण अपघातात दोन शिक्षिका जागीच ठार

अणदूर - तुळजापूर तालुक्यातील बाभळगावजवळ   स्कुटीला कंटेनरने धडक दिल्याने  दोन शिक्षिकांचा जागीच  मृत्यू झाला. अणदूरच्या वत्सलानगर शाळेत कार्यरत असलेल्या शाळेतील शिक्षिका   सपाटे आणि कोळी मॅडम विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करून स्कुटीने घरी परतत असताना एका कंटेनरने ओढत नेल्याने त्यांचा दुदैवी अपघाती मृत्यू झाला.


सोलापूर - हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बाभळगाव ता. तुळजापूर शिवारात भरधाव वेगाने येणा-या कंटेनरने स्कुटीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. 19 जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.


शशिकला नागेश कोळी (वय 45 वर्ष) व सीमा उर्फ रोहिणी शंकर सपाटे (वय 35 वर्ष) दोघी रा. सोलापूर असे अपघतात मृत्यू झालेल्या शिक्षिकांचे नावे आहेत. तुळजापूर तालुक्यातील अणदूरच्या वत्सलानगर मधील जिल्हा परिषद शाळेत सोलापूर येथील या दोन्ही महिला शिक्षिका कार्यरत होत्या. शालेय व्यवस्थापन समितीची बैठक व विद्यार्थ्याना पुस्तके वाटपाच्या नियोजनासाठी या दोन शिक्षिका  या ॲटिव्हा स्कुटीने सोलापूरहून आणदूरला आल्या. शाळेतील कामकाज संपल्यानंतर  शाळेतून त्या सोलापूरला ऑक्टिवा मोटारसायकल क्रमांक एम एच 13 सीएच 9867 वरुन जात आसताना बाभळगाव ता.तुळजापूर येथील पुलावर पाठीमागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या अपघतात ऑक्टिवा स्कुटी जवळपास 300 फुट फरफट गेली व दोन्ही शिक्षिका जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच  इटकळ औट पोस्ट चे सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.अपघात ग्रस्त वाहन पसार झाले आहे.


पोलीस प्रेसनोट 

रोहिणी शंकर सपोटे, वय 41 वर्षे, रा. जोडभावी पेठ, सोलापूर व शशीकला नागेश कोळी, वय 45 वर्षे, रा. सैफुल, सोलापूर या दोघी दि. 19.06.2020 रोजी 16.00 वा. सु. मौजे बाभळगाव तलावा जवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर स्कुटर क्र. एम.एच. 13 सीएच 9867 ने प्रवास करत होत्या. दरम्यान एका अज्ञात वाहन चालकाने निष्काळजीपणे, हयगईने वाहन चालवून रोहिणी सपोटे व शशीकला कोळी या दोघी प्रवास करत असलेल्या नमूद स्कुटरला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्या दोघीही मयत झाल्या आहेत. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजबीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत अज्ञात वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या नंदकुमार जगन्नाथ ढवाळशंख, रा. सोलापूर यांच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दि. 20.06.2020 रोजी नोंदवला आहे.

From around the web