पाच दिवसाचा आठवडा केला खरा , पण कर्मचारी अकरानंतरच ऑफिसमध्ये... 

उस्मानाबाद तहसील कार्यालयात सकाळी सव्वा दहा वाजता शुकशुकाटच !
 
s

उस्मानाबाद - राज्य सरकारने पाच दिवसाचा आठवडा करून कामाची वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी सव्वा सहा केली. शनिवार, रविवार तसेच सणासुदीला सुट्टी दिली. पण शासकीय कर्मचारी वेळेवर येतात का ? हा खरा प्रश्न आहे. 

आता उस्मानाबाद तहसील कार्यालयाचे हे चित्र तुम्हीच पाहा. शुक्रवारी सकाळी सव्वा दहा वाजता एकही कर्मचारी कामावर हजर नाही. तहसीलदारपासून क्लर्कपर्यंत सर्व कर्मचारी गैरहजर. जिल्हाधिकाऱ्यांच्या  कुशीत आणि  उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मुशीत वसलेल्या तहसील कार्यालयात इतका बेजबाबदारपणा चालत असेल तर अन्य कार्यालयाचा कारभार विचारायला नको. आता अश्या कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करणार कोण ? सगळे एका माळीचे सॉरी माळेचे मणी !

उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी यांचा उद्धटपणा

उस्मानाबाद तहसील कार्यालयाचा हा पंचनामा केला आहे, सत्यशोधक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी. तुम्हीही असा पंचनामा करू शकता आणि आम्हाला पाठवू शकता. आमचा व्हाट्स अँप नंबर आहे- 7387994411

d

d

d

sd

d

d

d

From around the web