उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात तिघांचा मृत्यू झाला आहे. सर्व रुग्ण उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यात ५६१ जणांचा बळी घेतला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी नव्या २९ रुग्णाची नोंद झाली तर ३० जण बरे होवून घरी परतले. ही  नोंद फक्त शासकीय असून, खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची नोंद नाही. 

गेल्या २४ तासात कौडगाव ता. उस्मानाबाद येथील एक ७० वर्षीय पुरुष, कौडगाव ता. उस्मानाबाद येथील ६५ वर्षीय पुरुष आणि कानेगाव ता. उस्मानाबाद येथील ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ५९४ रुग्ण आढळून आले असून, पैकी १४ हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३१० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

काळजी घ्या 

 नागरिकांना सूचित करण्यात येते की, कोविड-19 संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असून मास्कचा वापर न केल्याने व सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टंन्सींग) पालन न केल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे कोविड-19 बाबत शासन निर्देशांचे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी सूचित केले आहे.

From around the web