शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतील तीन अभ्यायक्रमांना राष्ट्रीय एन.बी.ए.मानांकन प्राप्त
धाराशिव - शासकीय तंत्रनिकेतन, ही संस्था,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगाच्या पाठीवर होत असलेल्या विविध तंत्रज्ञानाच्या अमूलग्र बदलात सामावून घेण्याच्या उद्वेशाने 1985 पासून सुरु करण्यात आलेली संस्था आहे.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी हि संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रिडीटेयान (एन.बी.ए.) नवी दिल्ली ही केंद्र शासनाची शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यांकन करणारी व संस्थेचा शैक्षणिक दर्जा ठरविण्याचं काम करणारी संस्था आहे.
शासकीय तंत्रनिकेतन, संस्थेत दि.28 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये एन.बी.ए. समितीने भेट देऊन संस्थेच्या सिव्हील इंजीनियरींग,मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रोनिक अँड टेलिक्मुनिकेशन इंजिनिअरींग या विद्याशाखांच्या शैक्षणिक गुणवतेचे एन बी ए मानकाप्रमाणे मुल्यमापन केले.या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये संस्थात्मक ध्येय व उदिष्टे,संस्था आणि प्रशासन,पायाभूत सुविधा,अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता,अभ्यासक्रम डिझाईन आणि पुनरावलोकन,सामाजिक संस्था,विद्यार्थी,माजी विद्यार्थी,अधिव्याख्याता, लायब्ररी,प्रयोगशाळा,उपकरणे,संगणक सुविधा इ. बाबींचा समावेश होता.
एन.बी.ए. समितीने सर्व स्तरावर संवाद साधून संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा यांचा आढावा घेतला.संथेमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण असून,उच्च दर्जाचे तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करुन हि संस्था महाराष्ट्रा पुरते मर्यादित न राहता देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देत आहे.या सर्व निकषांवर अभ्यास करुन, एन.बी.ए. समितीने तीन वर्षाकरता आपले उत्कृष्टतेचे मानांकन संस्थेतील तीन विभाग अनुक्रमे यंत्र अभियांत्रिकी, अणूविद्यूत अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी या विद्याशाखंना मानांकन प्राप्त झले आहे.
या यशामुळे संस्थेच्या व जिल्हयाच्या शैक्ष्णिक शिरपेचात एक मानाचा तुरा नव्याने रोवला गेला आहे.या यशाकरीता संस्थेचे प्राचार्य तथा यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.एस.एल.,अंधारे,एन.बी.ए. समन्वयक प्रा.जी.जी.ओवरीकर,विभागप्रमुख अणुविद्यूत प्रा.एस.आर.पंके ,विभागप्रमुख स्थापत्य प्रा.श्रीमती के.ए.आवटे व सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच विद्यार्थी सर्वाचे संचालक डॉ.व्ही.एम.मोहितकर व सहसंचालक डॉ.उमेश नागदिवे यांनी विशेष अभिनंदन केले.