उस्मानाबाद जिल्ह्यात पंधरवाडयामध्ये तीन बालविवाह रोखले

 
उस्मानाबाद जिल्ह्यात पंधरवाडयामध्ये तीन बालविवाह रोखले

उस्मानाबाद - महाराष्ट शासन महिला व बाल विकास विभागामार्फत दि.14 नोंव्हेबर ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीमध्ये बाल सुरक्षा सप्ताह,दत्तक सप्ताह राबविण्यात आला.

    या पंधरवाडयाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.  निपाणीकर यांच्या मार्गदर्शनानुसार व एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे यांच्या सुचनेनुसार उस्मानाबाद जिल्हयातील सुर्डी, अणदूर, उस्मानाबाद शहरातील देवकते गल्ली या ठिकाणचे एकून तीन बालविवाह वधु वराच्या कुटूंबाला समुपदेशन,पंचनामा करुन व हमीपत्र घेवुन बालविवाह रोखण्यात आले.

     हा बालविवाह रोखताना पोलीस विभाग, सुपरवाइजर वरुडेकर एस.एस.(उस्मानाबाद शहर) बालसंरक्षण अधिकारी विभावरी खुने,समुपदेशक कोमल धनवडे, समाज कार्यकर्ती प्रज्ञा बनसोडे, समाज कार्यकर्ता योगेश शेगर,क्षेत्रीय कार्यकर्ता हर्षवर्धन शेलमोलकर ग्रामसेवक विवेक मटके(सुर्डी),अंगणवाडी कार्यकर्ती सुरेखा शितोळे (सुर्डी),‍ढवळे सिंधुताई अंगणवाडी कार्यकर्ती अणदूर,भुजबळ पी.टी, कांबळे एस .आर. ग्रामपंचायत लिपीक अणदूर बाबुराव अडसुळ गावकरी तसेच सुहास कंदले कोमल कांबळे,बाबुराव अडसुळ, दिपक डोळस यांनी सदर बाल विवाह घटणास्थळी जावून रोखले.असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच.निपाणीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

From around the web