कळंब तालुक्यातील सरपंचपदाचे असे आहे आरक्षण... 

 
कळंब तालुक्यातील सरपंचपदाचे असे आहे आरक्षण...

कळंब - तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात झाली आहे.सन २०२० ते २०२५ या कालावधीतील सरपंच पदाची सोडत झाली आहे.ही सोडत तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळी ११ वाजता सुरु करण्यात आली असून १३ वर्षीय यश प्रमोद कांबळे या लहान मुलाच्या हातून चिट्टी काढून सोडण्यात आले आहे.

कळंब तालुक्यात ५९ ग्रामपंचायत ची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.यावेळी सरपंच पदाचे आरक्षण सोडत उशिरा झाल्याने गाव पुढाऱ्यांचा चांगलाच घाम निघाला आहे.आरक्षण सोडत वेळेत झाली नसल्याने उमेदवारांची मोठी हिरमोड झाली आहे.

असे आहे गाव निहाय आरक्षण
 बोरवंटी ,अनुसूचितजमाती  , वाघोली , अनुसूचितजमाती महिला, गंभीरवाडी, वडगाव(ज),बोरगाव(बु),शेळका धानोरा,लोहटा पूर्व, पानगाव, गोविंदपूर, रत्नापुर या गावासाठी अनुसूचित जाती असे आरक्षण आहे तर भोसा,हिंगणगाव,दुधाळवाडी, हसेगाव(शि), वाठवडा, देवधानोरा, बारातेवडी,सौंदना ढोकी, एरंडगाव, ढोराळा या गावचे सरपंच आरक्षण अनुसूचित जाती महिला या साठी आरक्षित झाले आहे.

तर माळकरंजा, हाळदगाव,निपाणी, घारगाव, गौरगाव, खामसवाडी,आंदोरा, पाथर्डी, कन्हेरवाडी,दहिफळ,भाटसांगवी, पाडोळी,तांदुळवाडी, शेलगाव(ज),बोरगाव(खु), मलकापूर, संजीतपुर, नायगाव, खेर्डा,उमरा, परतापूर, दाभा, कोथळा, नागुलगाव,  आवाडशीरपुरा, या गावचे सर्वसाधारण असे आरक्षण आरक्षित करण्यात आले आहे 

तर आडसुळवाडी,सापनाई, गौर,येरमाळा, शेलगाव (दि), वाकडी(के), बाभळगाव, बोरगाव(ध), भोगजी, सौंदना आंबा, खडकी, मोहा, मंगरुळ,बोर्डा, वाकडी(ई), एकुरगा, लोहटा पश्चिम, हासेगाव(केज), पिंप्री (शि), सातेफळ, भाटशिरपुरा, ताडगाव, वडगाव(शि),जायफळ,या गावचे आरक्षण सर्वसाधारण महिलांना आरक्षित झाले आहे.तर खोदला, रांजनी,हावरगाव, लासरा,कोठाळवाडी,मस्सा(ख), वानेवाडी शिंगोली,बांगरवाडी,उपळाई,चोराखळी,देवळाली,या गावचे आरक्षण ना मा प्र असे आरक्षित करण्यात आले आहे तर सात्रा, बहुला, बरमाचीवाडी,रायगव्हाण,आथर्डी, पिंपळगाव (डोळा),जवळा(खु), करंजकल्ला,नागझरवाडी, शिराढोन, डिकसळ ईटकूर या गावचे आरक्षण ना मा प्र महिला साठी आरक्षित करण्यात आले आहे.

या मधील ५९ गावातील ग्रामपंचयातची निवडणूक झाली असून येरमाळा, ईटकूर मंगरूळ या गावांमध्ये मोठी चुरस झाली होती. सदरील आरक्षण सोडत ही उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसीलदार मंजुषा लटपटे, नायब तहसिलदार असलम जमादार,परिशिक्षित तहसिलदार रोहन शिंदे यांच्या सह ग्रामीण भागातील नागरिक पुढारी उपस्थित होते.

From around the web