धाराशिव जिल्ह्यातील या आठ शाळा आहेत अनधिकृत 

शासनाची परवानगी नसणाऱ्या शाळांमध्ये पालकांनी पाल्यास प्रवेश घेवू नयेत : सुधा साळुंके

 
 
news

धाराशिव - जिल्ह्यामध्ये शासनाची परवानगी न घेताच अनाधिकृतरित्या खाजगी प्राथमिक शाळा सुरु केल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विभागास अहवाल सादर केले आहेत. त्या अहवालानुसार सदर शाळा अनाधिकृत असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. तरी पालकांनी पुढील शाळांमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेवू नये असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुधा साळुंके यांनी केले आहे.

तेर येथील चंद्रकला देवी पाटील इंग्लीश स्कूल आणि लिटल फ्लॉवर इंग्लीश स्कूल, चिखली येथील विश्वप्राप्ती इंग्लीश स्कूल आणि गांधी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कूल, भूम तालुक्यातील खंडेश्वर पब्लीक स्कूल पार्डी रोड भूम, कळंब तालुक्यातील डिकसळ येथील शारदा इंग्लीश स्कूल आणि आवाड शिरपुरा काळदाते वस्ती येथील जिजाऊ इंग्लीश स्कूल, वाशी तालुक्यातील वाशी फाटा (टेंभीआई) येथील संस्कार प्रबोधिनी गुरुकल, खामकरवाडी येथील ज्ञानप्रबोधिनी गुरुकुल, शेकापूर रोड उस्मानाबाद येथील स्टेपिंग स्टोन इंग्लीश प्रायमरी स्कूल (इयत्ता सहावी आणि सातवी वर्ग), उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील सनराईज इंग्लीश स्कूल (इयत्ता पाचवी ते आठवी वर्ग) या शाळांमध्ये प्रवेश घेण्यात येवू नयेत.

From around the web