मेडिकल कॉलेज झाले पण रुग्णाचे हाल कायम ... 

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या अक्षय नाईकवाडी यास जिल्हा रुग्णालयात  साधी पित्ताची गोळी आणि ORS  मिळाले नाही.... 
 
s
हा घ्या पुरावा 

धाराशिव। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे निलेश साळुंके व अक्षय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होते, त्यांनी  हे उपोषण  मागे घेतल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात  उपचारासाठी दाखल झाले असता, त्यांना साधी साधी पित्ताची गोळी आणि ORS सुद्धा मिळाले नाही. यावरून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे भयाण वास्तव समोर आले आहे. 

धाराशिवचे जिल्हा शासकीय रुग्णालय आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आले आहे. मेडिकल कॉलेज झाल्यानंतर रुग्णाला सर्व सुविधा आणि औषधोपचार मिळतील ही अपेक्षा फोल ठरली आहे. मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठता  डॉ.शिल्पा डोमकुंडवार, वैद्यकीय अधीक्षक  डॉ. तानाजी लाकाळ यांच्या निष्क्रिय कारभारामुळे रुग्णाचे हाल जैसे थे आहेत. 

s


 मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव येथे निलेश साळुंके व अक्षय नाईकवाडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.६ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलं होते, त्यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यांना साधी पित्ताची गोळी आणि ORS सुद्धा मिळाले नाही.

s

मेडिकल कॉलेजला लाखो रुपयाचा निधी येतो, तो नेमका कुठे जातो ? असा प्रश्न पडला आहे. येथे येणाऱ्या रुग्णाला बाहेरून औषधे खरेदी करावे लागत आहेत. वैद्यकीय अधिकारी वेळेवर येत नाहीत, आले तर लगेच निघून जातात. रुग्णाला गंभीर आजार झाला तर आपल्या खासगी हॉस्पिटलचा रस्ता दाखवतात. शासनाने  शासकीय रुग्णालयात औषधोपचार मोफत केले असले तरी जिल्हा रुग्णालयात औषधच मिळत नाही. 

  • फॉरेन्सिक औषध Forensic medicine (FMT) चे वैद्यकीय अधिकारी शव विच्छेदन Post mortem करत नाहीत
  • रात्रपाळीसाठी  आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी नीट रूम नाही. येथील बाथरूम गलिच्छ आहेत. 
  • जिल्हा रुग्णालयातील  उपहारगृहात रुग्णांना नाश्ता , जेवण निकृष्ट  दिले जाते. कोटेशनमध्ये दिलेले पदार्थ दिले जात नाहीत, कमिशन खाऊन अभय दिले जाते.  


मेडिकल कॉलेज वैद्यकीय शिक्षण मंत्र्याकडे येते,पण टीकेचे धनी राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत झाले आहेत, सोशल मीडियावर नेटकऱ्यानी तानाजी सावंत यांना लक्ष केले आहे. शासन आपल्या दारी ऐवजी शासन आपलं दरिद्री अशी टीका एका नेटकऱ्याने केली आहे. 


 

s

 

From around the web