... तर घोडके यांना एक लाख बक्षिस देऊ !

मोर्चा, उपोषण करणे हा घोडके याचा बिझनेस 
 
x

उस्मानाबाद - अणदूरच्या श्री खंडोबा  देवस्थानचा कारभार अत्यंत पारदर्शक सुरु असून, काही पोटशूळ उठलेली मंडळी देवस्थानच्या शेतजमिनीवर डोळा ठेवून नाहक  बदनाम करत आहेत. खाऊन - पिऊन  चक्री उपोषण करणाऱ्या अरविंद घोडके याने देवस्थानकडे तीन ते चार हजार एकर जमीन असल्याचे सिद्ध केल्यास त्यास एक लाख  रुपये बक्षीस देण्यात येईल आणि  हे खोटे ठरल्यास त्याने देवस्थानची नाक घासून माफी मागावी, असे आव्हान मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिले आहे.

अरविंद घोडके याने देवस्थानकडे ३ ते ४ हजार एकर जमीन असल्याचे सांगून,गुरव समाज  शेतजमिनीची विक्री करत असल्याचा खोटा आरोप केला आहे. वास्तविक श्री खंडोबा  देवस्थान नावे फक्त ८०० ते ९०० एकर जमीन असून पैकी  २५० एकर जमीन देवस्थानच्या देखभालीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.  ही जमीन छत्रपती शाहू महाराज यांनी तीनशे  वर्षांपूर्वी दान केली आहे. तसे ताम्रपट देवस्थानकडे उपलब्ध आहे.

श्री खंडोबा  देवस्थान समिती ( ट्रस्ट ) १९६५ मध्ये स्थापन झालेली असून, वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट - अ मिळाला आहे. तसेच देवस्थान शेतजमिनी संदर्भात औरंगाबाद  खंडपिठाने काही महिन्यापूर्वी आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे.त्यानंतरही  देवस्थानची जमीन काढून घ्या, म्हणणे म्हणजे हा हायकोर्ट निकालाचा अवमान नाही का ? असा सवाल ढेपे यांनी विचारला आहे.

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही गावाची लोकसंख्या  ५० हजार आहे, दोन्ही गावातील मिळून १०० ते १२० लोकांनी दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढला.हा मोर्चा भाडोत्री  होता. गाडी आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करूनही लोक आले नाहीत. घोडकेचा उपोषण आणि मोर्चा काढण्याचा बिझिनेस असून, त्याने आजवर किती मोर्चे काढले, त्याचे पुढे काय झाले हे तपासून पाहवे, असेही ढेपे यांनी म्हटले आहे.

From around the web