तेरणा नदीच्या पुलावरून पाण्याचा प्रवाहात युवक दुचाकीसह गेला वाहून

दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

 
s

तेर  - उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे. पावसाच्या थैमानामुळे तेरणा नदीला आलेल्या पुरात तेर येथील एक युवक दुचाकीसह वाहून गेला होता, आज त्याचा मृतदेह सापडला आहे. 


गोदावरी भागात राहणारा प्रशांत अण्णासाहेब मदने ( १८) हा युवक पेठ भागाला जोडणाऱ्या तेरणा नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात दुचाकीसह शनिवारी वाहून गेला होता.  यावेळी ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या युवकाला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधार झाल्याने ग्रामस्थांनी शोध मोहीम थांबविली. 

सदरील दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना बोलून त्वरित शोध मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम घेऊन उस्मानाबाद चे तहसीलदार गणेश माळी दाखल झाले होते.

तेरणा नदीच्या पात्रात शोध कार्य सुरुवात केली. परंतु दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठा पाऊस सुरू झाल्यामुळें शोध मोहीम थांबवावी लागली होती. आज पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली असता सदर युवकाचा मृतदेह सापडला आहे. 

From around the web