उस्मानाबादच्या महिला उपनिरीक्षकास पोलिसानेच चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले 

आरोपी पोलिस नाईक यास सात वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांची शिक्षा 
 
s

उस्मानाबाद : आनंदनगर पोलीस स्टेशनच्या तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा गिरी यांना चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याच्या आरोपावरून   पोलिस नाईक आशिष ढाकणे यास सात वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली आली. जिल्हा व स्तर सत्र  न्यायाधीश नीता मखरे यांनी सोमवारी हा निकाल दिला. 


३१ मे २०१९ रोजी सकाळी सहाच्या सुमारास शहरातील श्री कृष्ण नगरमधील निर्मल अपार्टमेंटमध्ये  राहणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक मनिषा गिरी या इमारतीवरुन पडल्याने जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी प्रथमदर्शनी मनिषा गिरी यांनी अज्ञात कारणावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसुन आले. त्यानुसार तसाच गुन्हा पोलिस ठाण्यात नोंदविला होता, मात्र उस्मानाबाद लाइव्हने या प्रकरणी पाठपुरावा करून संपूर्ण प्रकरणाची पोलखोल केली होती. 

 जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर उपचारादरम्यान मनिषा गिरी यांनी पोलिसांना जबाब दिला. तेव्हा पोलिस मोटार परिवहन विभागामध्ये सेवेत असलेला पोलिस कर्मचारी आशिष ढाकणे याने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन खाली फेकुन दिल्याचे जबाबात सांगितले. आशिष ढाकणे विरोधात ता.२९ जुन रोजी ३०७ नुसार आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 तपास अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड होते, तर शासकीय अभियोक्ता म्हणुन एस.बी.जाधवर यांनी कामकाज पाहिले.

From around the web